शिवसेना उपनेते तथा खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यांच्या हस्ते शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रवेश


नांदेड।
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील निष्ठावंत शिवसैनिकांना कुठलाही मान सन्मान दिला जात नव्हता. त्यांच्या मतांचा आदर होत नव्हता. त्यामुळे सतत होणाऱ्या अपमानास कंटाळलेल्या शिवसैनिकांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवार आल्यापासून हिंदूत्वाचा विचार पुढे घेऊन जाणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेत्रत्व मान्य करत शिंदे गटात प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. खासदार हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.दोन) जिल्ह्यातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात जाहिर प्रवेश केला.


यात लोहा – कंधार विधानसभेचे विधानसभा संघटक मिलिंद पवार, कंधारचे शिवसेना शहरप्रमुख धनराज (बाळु) लुंगारे, लोह्याचे माजी नगरसेवक तथा युवक काँग्रेसचे विधानसभा माजी अध्यक्ष युवराज वाघमारे, शेतकरी कामगार पक्षाचे युवा जिल्हाप्रमुख मारोतराव यजगे, लोहा मार्केट कमेटिचे सदस्य बालाजी बहिरे, युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस बालाजी सपूरे पाटील, माधव मस्के, गजानन मस्के, साईनाथ करडीले, शिवानंद पुयड, शिवाजी करडीले, शिवानंद जाधव, गजानन संगेकर, बामणीजी पाटील आवातिरकर, माधव पुयड, प्रभाकर पुयड, परमेश्वर पुयड, लक्ष्मण पुयड, माधव पुयड, राजू पाटील खाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. 

याप्रसंगी प्रवेश झालेल्या शिवसैनिकांचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल व त्यांना कुठेही कमी पडुदिले जाणार नाही, सर्वांना सोबत आणि विचारात घेऊन विकास कामे केले जातील असा खासदार हेमंत पाटील यांनी शिवसैनिकांना विश्वास दिला. यावेळी जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर, शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले,शिवसैनिक श्याम वानखेडे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी