नांदेड| अश्विनी वैष्णव, माननीय मंत्री रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, भारत सरकार उद्या, दिनांक 03 ऑक्टोबर, 2022 रोजी (सोमवार) औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या कार्यक्रमात कोच देखभाल सुविधांच्या विकासासाठी पिटलाईन ची पायाभरणी करणार आहेत. श्री रावसाहेब पाटील दानवे, माननीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, भारत सरकार आणि डॉ. भागवत कराड, माननीय वित्त राज्यमंत्री, भारत सरकार मान्यवर अतिथी म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहतील.
औरंगाबाद रेल्वे स्थानकावरील कार्यक्रम दिनांक 03 ऑक्टोबर, 2022 (सोमवार) रोजी सकाळी 09.30 वाजता होणार आहे. श्री संदीपान भुमरे, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री, महाराष्ट्र शासन आणि पालकमंत्री, औरंगाबाद जिल्हा; श्री अब्दुल सत्तार, माननीय कृषी मंत्री, महाराष्ट्र सरकार; श्री अतुल सावे, सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, महाराष्ट्र सरकार; श्री सय्यद इम्तियाज जलील, माननीय खासदार, औरंगाबाद; श्री अंबादास दानवे, माननीय विरोधी पक्षनेते, विधान परिषद, महाराष्ट्र; माननीय आमदार - श्री सतीश चव्हाण आणि श्री विक्रम काळे; माननीय आमदार - श्री संजय शिरसाट; श्री प्रदीप जैस्वाल, श्री हरिभाऊ बागडे; श्री प्रशांत बंब, श्री रमेश बोरनारे, श्री उदयसिंग राजपूत आणि इतर लोकप्रतिनिधी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी देखील औरंगाबाद येथील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
नंतर, जालना रेल्वे स्थानकावर कोच देखभाल सुविधेसाठी (पिटलाईन) पायाभरणी समारंभ दिनांक 03 ऑक्टोबर 2022 (सोमवार) रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. श्री अतुल सावे, माननीय सहकार मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट्र शासन आणि पालकमंत्री, जालना जिल्हा; श्री अंबादास दानवे, माननीय विरोधी पक्षनेते, विधान परिषद, महाराष्ट्र; माननीय आमदार - श्री सतीश चव्हाण, श्री विक्रम काळे आणि श्री राजेश राठोड; माननीय आमदार - श्री राजेश टोपे, श्री कैलास गोरंट्याल, श्री संतोष दानवे, श्री नारायण कुचे इतर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होतील.