9 ऑक्टोबरला स्वा. सावरकर स्मारकात ‘हलाल’ सक्ती विरोधी परिषदेचे आयोजन -NNL


मुंबई ।
येथे 12 आणि 13 नोव्हेंबर या दिवशी हलाल परिषद होणार आहे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या परिषदेला जोरदार विरोध दर्शवला आहे. या परिषदेच्या, तसेच ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात पुढील दिशा निश्चित करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने 9 ऑक्टोबरला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर (प.) येथे सायं. 5.30 वाजता ‘हलाल’ सक्ती विरोधी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

यावेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी संकलित केलेला ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर (प.) येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम आणि अखिल भारतीय खाटीक समाजाचे महाराष्ट्र प्रभारी श्री. विवेक घोलप आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे हे सुद्धा उपस्थित होते.

हलाल’ सक्ती विरोधी परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी खासदार डॉ. विजय सोनकर शास्त्रीजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार, ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे, वसई (मेधे) येथील परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, महाराष्ट्र राज्य सराफ आणि सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष श्री. मोतीलाल जैन आणि अखिल भारतीय खाटीक समाजाचे महाराष्ट्र प्रभारी श्री. विवेक घोलप, पितांबरी उद्योगसमूहाचे मालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई, लोकप्रसिद्ध व्याख्याते आणि पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आदी सन्माननीय वक्ते संबोधित करणार आहेत.

 हलाल आता केवळ मांसापुरती मर्यादित राहिले नसून धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी अनेक उत्पादनेही ‘हलाल’ प्रमाणित असावीत, या दृष्टीने हिंदू व्यापार्‍यांना सक्ती केली जात आहे. हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली देशभरात हिंदु व्यापार्‍यांकडून हजारो कोटी रुपये गोळा केले जात आहेत. आवश्यकता नसतांना बहुसंख्य हिंदूंना हलाल पदार्थ खरेदी करायला भाग पाडले जात आहे. भारत शासनाच्या ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)’ या अधिकृत संस्थेकडून प्रमाणपत्र घेतलेले असतांनाही खाजगी मुसलमान संस्थांकडून हलाल प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. एकूणच भारताच्या अर्थव्यवस्थेवर आक्रमण करून अर्थव्यवस्था दुर्बल करण्याचा पद्धतशीर प्रयत्न ‘हलाल’द्वारे केला जात आहे. हिंदु बांधवांनी मोठ्या संख्येने या हलाल सक्ती विरोधी परिषदेला उपस्थित रहावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 8080208958 या क्रमांकावर संपर्क करावा, तसेच Facebook.com/SavarkarSmarak आणि Facebook.com/JagoHinduMumbai या लिंक वरून या परिषदेचे लाइव्ह प्रसारण केले जाणार आहे.

डॉ. उदय धुरी,प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती(, संपर्क क्र.: 9967671027)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी