संजय बियाणी खुन प्रकरणात मा. मोक्का न्यायालयात 4123 पानांचे दोषारोपपत्र दाखल -NNL


नांदेड|
शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक संजय बियाणी यांचा दि. ५ एप्रिल २०२२ रोजी मोटार सायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांचे राहते घरासमोर गोळया झाडून हत्या केली होती. सदर प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२, ३०७, ३४ भा.द.वि. आणि सहकलम ३/२५ आ. ह का प्रमाणे गुन्हा नोंद करून या गुन्ह्याच्या तपासासाठी उप महानिरीक्षक, नांदेड मा. श्री निसार तांबोळी यांनी तपासकामी  पोलीस, नांदेड परिक्षेत्र नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर विजय कबाडे यांचे नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना केली. या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम करून नमुद गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले. 

ज्यामध्ये कुख्यात गुन्हेगार आरोपी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा चरणसिंघ याने स्वत: संघटीत गुन्हेगारांची कळल्याने संधु याने स्वत:च्या आर्थीक फायद्यासाठी संघटीत गुन्हेगारांची टोळी तयार करुन गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयात आरोपी नामे 01) इंद्रपालसिंघ उर्फ सन्नी पिता तीरतसिंग मेजर, रा.चिखलवाडी कॉर्नर नांदेड, 02) मुक्तेश्वर उर्फ गोलु विजय मंगनाळे, रा. नाईकनगर नांदेड, 03) सतनामसिंग उर्फ सत्ता दलबिरसिंग शेरगील रा. शहीदपूरा गेट नं. 06 नांदेड, 04) हरदिपसिंघ उर्फ सोनु पिनीपाना सतनामसिंग बाजवा, रा.रामदास यात्रीनिवास नांदेड, 05) गुरमुखसिंग उर्फ गुरी सेवासिंग गिल रा. गेट नं. 06 शहीदपूरा नांदेड, 06)  करणजितसिंग रघबिरसिंग शाहु रा. गेट नं. 03 बडपूरा नांदेड, 07) हरदिपसिंग उर्फ हार्डी उर्फ लकी बबनसिंग सपुरे रा. यात्री निवास रोड गणपत निवास,

मराठवाडा एकजुट प्रेसजवळ नांदेड, 08) कृष्णा उर्फ पप्या धोंडीबा पवार रा. आमदुरा ता.मुदखेड जि.नांदेड, 09) हरीष मनोज बाहेती, वय 28 वर्षे रा. मारवाडगल्ली, वजीराबाद, नांदेड, 10) रणजीत सुभाषराव मांजरमकर, रा.वैशाखीनगर नांदेड, 11) सरहानबिन अली अलकसेरी, रा.अरबगल्ली किल्ला रोड ईतवारा नांदेड, 12) गुरुप्रितसिंघ उर्फ दान्या उर्फ सोनी पिता गुलझारसिंघ खैरा, रा. दशमेशनगर बाफनाजवळ नांदेड, 13) कमलकिशोर गणेशलाल यादव, रा. दिलीपसिंघ कॉलनी वजीराबाद, नांदेड, यांना अटक करण्यात आलेली असुन फरार असलेले आरोपी 14) हरविंदरसिंघ उर्फ रिंदा चरणसिंघ संधु, वय 38 वर्षे अंदाजे रा. गुरुद्वारा गेट नं. 05 शहीदपूरा नांदेड, 15) सुनिल उर्फ दिपक पिता सुरेश रा. सुरखापूर जि. झज्जर राज्य हरीयाणा, 16) दिव्यांशु उर्फ पहेलवान रामचेत,रा. कुतुबपूर पोस्ट पूराबाझार जि. अयोध्या राज्य उ.प्रदेश यांचा गुन्हयात सहभाग दिसुन आला आहे आहे. 

सदरचा गुन्हा हा आर्थीक फायद्यासह, संघटीतरित्या केला असल्याने सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1)0),3(2),3(4) वाढीबाबतचा प्रस्ताव मा. श्री. निसार तांबोळी, पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांचेकडे पाठविण्यात आला. त्यांनी सदर कलम वाढ करणे बाबतची सूचना दिली. त्यावरुन सदर गुन्हयाचा तपास अर्चित चांडक, सहाय्यक पोलीस अधिक्षक, उपविभाग बिलोली यांचेकडे देण्यात आला. त्यांनी सदर गुन्ह्यात कलम वाढ करुन आरोपीताला मोक्का न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेऊन तपास केला आहे. गुन्हयाचे तपासात नमुद आरोपीतांविरुध्द पुरावे हस्तगत करण्यात येऊन उपलब्ध पुराव्याचे आधारे सदर गुन्हयाचे वर नमुद अधिकारी श्री. अधित चांडक, सहाय्यक पोलीस अधिक्षक, उप विभाग बिलोली कॅम्प नांदेड आरोपीतांविरुध्द 4123 पाने समाविष्ठ असलेले दोषारोप तयार केले. 

दिरपत्र मा. श्री निसार तांबोळी, पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र नांदेड, यांनी (16) क सवर मार मार शेवाळे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, मा अग्र श्री. निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अर्थित चांडक, मकर, ना. लीस अधिक्षक, उप विभाग बिलोली केंग्प नांदेड यांनी आज दिनांक 07.10.2022 रोजी क्रमांक 128/2022 दिनांक 05.10.2022 प्रमाणे मा. मोक्का न्यायालय, नांदेड येथे दाखल केले असून, न ज्याचा स्पेशल मोक्का कोर्ट केस क्रमांक 98/2022 दिनांक 07.10.2022 असा आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी