नांदेड। स्वा. रा. ती. म. विद्यापीठ व यशवंत महाविद्यालय ह्यांच्या वतीने पार पडलेल्या क झोन बास्केट बॉल स्पर्धेत मुलांच्या गटात यशवंत महाविद्यालयाने प्रथम व शारीरिक शिक्षण महाविद्यालय कौठा नांदेड संघाने द्वितीय क्रमांक मिळवला व मुलींच्या गटात एसजीजीएस महाविद्यालयाने प्रथम व यशवंत महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे क्रिडा संचालक डॉ विठ्ठलसिंह परिहार, प्राचार्य जी. व्ही. शिंदे,निवड समितीचे डॉ.विक्रम कुंटूरकर, प्राचार्य डॉ. बळीराम लाड, डॉ.सीमा सबनीस, डॉ.मनोज पैजणे, डॉ.बालाजी जाधव ह्याच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
निवड समितीने विभागीय बास्केट बॉल स्पर्धेसाठी क झोन चा संघ झहीर केला.या स्पर्धेत पंच म्हणुन संदीप निखाते, जयपाल गजभारे, शेख रमजू. नागसेन वाढवे, उमेश देशमुख, सोहन सोनकांबळे, विकास मेहकर,साहेबराव शिंदे यांनी काम केले.