नांदेड पोलिस अधिक्षक यांना अपंग आयुक्ताचे लेखी आदेश मिळाले - चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर
नांदेड। दिव्यांग कायदा 2016 कलम 92 हे फक्त कागदोपत्री राहात असल्यामुळे दिव्यांगाची बाजु कमकुवत असल्यामुळे त्यांच्या व्यंगावर,संपतीबदल, त्यांना त्रास होत असुन, त्यांचि व त्यांच्या पाल्याचि हत्या सुध्दा होत आहे. नांदेड शहरात अंध जोडपे अंकुश हट्टेकर हे दोघेहि शंभर टक्के अंध रेल्वेत खेळणी विकुन दिव्यांगत्वावर मात करून जगत असताना त्यांच्या सहा वर्षाच्या मुलीचा खुन करुन नदीत फेकला असे कितीतरी ऊदाहरण महाराष्ट्रात होत आहेत.
दिव्यांग बांधवाना आपल्या हक्कासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये दिव्यांगाचा पाच टक्के निधी मिळावा म्हणुन ऊपोषण करताना सोल्हापुर जिल्हयात कु्,वैष्णवी कुरूळे चा मृत्यु झाला, त्यास जबाबदार अधिकारी यांच्यावर योग्य ते कार्यवाहि व संबधित पोलीस स्टेशनकडुन दिव्यांग कायदा कलम ९२ ची अंमलबजावणी होत नाही.
शासन,प्रशासन जागे करण्यासाठी भर पावसात नांदेड जिल्हयातुन दिव्यांग.वृध्द. निराधार मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेत्रत्वाखाली अपंग आयुक्त पुणे येथे शासन प्रशासन चा निषेध आंदोलनात तेरा प्रश्नावर दिव्यांग आयुक्त यांनी शिष्टमंडासोबत चर्चा करून पाच दिवसात नांदेड जिल्हातील पोलिस अधिक्षक नांदेड यांना लेखी आदेश धडकले यांचि पोलीस अधिक्षकानी त्वरीत दखल घेऊन दिव्यांगाच्या कायदा व कलमाची अंमलबजावणी न करणाऱ्या दिव्यांगाना हक्कापासुन वंचित ठेवणाऱ्या अधिकारी यांच्यावर कार्यवाहि करावी. असे प्रसिध्दी पत्रक चंपतराव डाकोरे पाटिल, ज्ञानेश्वर नवले, राजुभाऊ शेरकुरवार ,विठ्ठलराव बेलकर,अनिल रामदिनवार, नागोराव बंडे ईत्यादी कार्यकर्त्येनि केले.