डिजिटल मिडिया परिषदेच्या शाखा राज्यभर होणार -एस.एम देशमुख -NNL


नांदेड/मुंबई।
महाराष्ट्रात सहा हजारांच्या आसपास यु ट्यूब चॅनल्स आणि न्यूज पोर्टल्स कार्यरत आहेत..अगदी तालुक्यात आणि गाव पातळीवर देखील युट्यूब चॅनल्स जाळे विणले गेले आहे.. उद्याची गरज लक्षात घेऊन सरकार देखील युट्यूब चॅनल्स नोंदणीसाठी नवी व्यवस्था सुरू करीत आहे.. महाराष्ट्र सरकारने डिजिटल मिडियात काम करणारया पत्रकारांसाठी पुरस्कार योजना यापुर्वीच सुरू केलेली आहे.. या पार्श्‍वभूमीवर मराठी पत्रकार परिषद नव्या बदलापासून दूर राहू शकत नाही.. काळाची गरज लक्षात घेऊन 

मराठी पत्रकार परिषदेने देखील डिजिटल मिडिया परिषद नावाची स्वतंत्र विंग सुरू केलेली आहे.. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात डिजिटल मिडिया परिषदेच्या शाखा सुरू करण्यात येत आहेत.. राज्यातील पुणे, सातारा, बीड, भंडारा आणि अन्य जिल्ह्यात हे काम वेगात सुरू आहे..सर्व जिल्ह्यात सदस्य नोंदणी आणि अस्थाई शाखा सुरू झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये डिजिटल मिडिया परिषदेचा एक मेळावा पुण्यात घेण्यात येईल.. तेथेच राज्यस्तरीय कार्यकारिणी निवडली जाईल..

डिजिटल मिडिया परिषद हा मराठी पत्रकार परिषदेचाच एक अंगिकृत उपक्रम असल्याने मराठी पत्रकार परिषदेचे सर्व नियम डिजिटल मिडिया परिषदेवर देखील बंधनकारक असतील.. डिजिटल मिडिया परिषद ही वेगळी संघटना नसून तालुका आणि जिल्हा संघांना पूरक अशी व्यवस्था असल्याने डिजिटल मिडियाने जिल्हा पत्रकार संघ आणि तालुका पत्रकार संघाशी सलोख्याचे संबंध ठेऊनच काम करावे अशी अपेक्षा आहे.. जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ आणि डिजिटल मिडिया परिषदेने हातात हात घालून, परस्परांना पूरक ठरेल असे काम करीतच मराठी पत्रकार परिषदेने उभी केलेली चळवळ पुढे न्यायची आहे..

पुण्यात होणारया डिजिटल मिडिया परिषदेच्या मेळाव्यात डिजिटल मिडियाची रचना, स्वरूप आणि कार्याबद्दल चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.. तूर्त सदस्य नोंदणीसाठी सर्व जिल्हा आणि तालुका संघांनी डिजिटल मिडिया परिषदेला मदत करावी ही विनंती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी