आयोजकांकडून महिलांचे आरोग्य तपासणी शिबीरात ४९० तपासणी, महिला सक्षमीकरण
शिवणी, प्रकाश कार्लेवाड। महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ नांदेड व महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्दम विकास कार्यक्रम या योजनेअंतर्गत प्रगती लोकसंचलित साधन केंद्र किनवट यांच्याद्वारे दहावे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन किनवट आदिवासी बहुल भागातील शिवणी येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात सीएमआरसीच्या सहसचिव कमलबाई देशमुख यांच्या वतीने दि.२३ सप्टेंबर रोजी महिलांना मार्गदर्शन व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती प्रभावतीताई शेंडे,यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मानव विकास नियोजन अधिकारी सुरेश थोरात, प्रमुख अतिथी म्हणून मानव विकास विभागाचे कांगणे,तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक अधिकारी चंदनसिंग राठोड, सी.एम. आर.सी.च्या सचिव सुकेशना कपाटे,नगरपालिकेच्या एपीओ विजया वाघमारे, देसाई फाउंडेशन ट्रस्टच्या किरण चौधरी,शिवणी गावच्या सरपंच लक्ष्मीबाई डुडुळे,उपसरपंच सुनीता संतोष जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पोगे, इस्लापुर पोलीस ठाण्याचे सपोनि रघुनाथ शेवाळे, किनवट येथील व्यवस्थापक विशाल श्रोते, लेखापाल अहमद सिद्दीकी व पत्रकार प्रकाश कार्लेवाड यांची या व्यासपीठावर उपस्थिती होती.
या वार्षिक सभेसाठी किनवट,माहूर, हिमायतनगर,या तीन तालुक्यातील ४८० महिला बचत गटांच्या हजारो महिलांना मार्गदर्शन प्रगती लोकसंचलित साधन केंद्राचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.प्रभावतीताई शेंडे म्हणाल्या की महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून छोटे-मोठे आणि लघु उद्योग उभारून आर्थिक दृष्ट्या सक्षम कसे बनावे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले,त्याच बरोबर वैद्यकीय अधिकारी डॉ.यु.व्ही पोगे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,आपली आरोग्य हीच संपत्ती आहे. त्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी महिला बचत गटाच्या महिलांनी कुठलेही आजार न लपवता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी घ्यावा असे मत व्यक्त केले. तर सपोनि शेवाळे बोलतांना म्हणाले की महिलांनी आपल्यावर होणारे अत्याचार कदापि सहन करू नये,व महिलांना राज्य घटनेत दिलेल्या अधिकार जाणून घ्यावे असे कायदेविषयक मोलाचे मार्गदर्शन करत पोलीस प्रशासन २४ तास आपल्या सेवेत उपस्थित आहे.असे मत व्यक्त केले.
तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी थोरात यांनी मूल व चूल इथपर्यंत महिलांनी मर्यादित न राहता महिलांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून घरातिल काम करत लघु व मध्यम उद्योग करत आपले आर्थिक विकास करावा या साठी मानव विकास योजना आपल्या आर्थिक विकासाचा माध्यम होण्यासाठी सदैव तत्पर आहे.तर महिलांनी निडर पणे लघु व मध्यम उद्योग करण्यासाठी मानसिकता निर्माण करावे असे मत व्यक्त केले.जिल्हा समन्वयक राठोड यांनी विविध बँके सोबत करार करून २०२१-२०२२ मार्च पर्यंत १३ कोटी रुपये विविध महिला बचत गटांना वाटप केले आहे.तर या नंतर ही हे वाटप चालू राहील असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला पत्रकार तसेच जिल्हाभरातून ४८० महिला बचत गटांच्या पदाधिकारी सह हजारो महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.या वेळी प्रार्थमिक आरोग्य केंद्र शिवणी च्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात ४९० महिलांची तपासणी करण्यात आली आरोग्य कर्मचारी सी.एम.सोंडारे,सपना ठेंगणे,एल.यु.पवार,लक्ष्मीताई कारामांची,आरोग्य सहाय्यक एल.एम.उबरे सह प्रयोगशाळा तंत्रज्ञ परमेश्वर तोरकड कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक विशाल श्रोते यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.कविता फोले यांनी केले.आभार सिध्दीकी अजहर यांनी मानले या वेळी प्रगती लोकसंचलित साधन केंद्राचे सर्व सहयोगीनी कर्मचारी गट उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवणी येथील एकूण ३३ बचत गटाच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेऊन परिश्रम घेतले.