नांदेड। आपण भारताचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करतो दुसरीकडे अनाथ बेघर झोपडपट्टीतील चिमुकल्यांना शिक्षण मिळेल का उच्चशिक्षित बनतील का, आशा चिंतेनेच हिमायतनगर तालुक्यातील टाकराळा येथील अनाथ बेघर झोपडपट्टीतील मूलांना गेले ३ वर्ष पासून उत्तम पाईकराव सरांनी मोफत साक्षेरतेचे धडे देत आहे.
या मुलाकडून उत्तम पाईकराव सर कधीही ऐक ही रुपया न घेता त्यांच्या वेळेतला वेळ काढून स्व खर्चाने या मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे . आज कालच्या शैक्षेणिक शेत्रात शिक्षणासाठी लाखो रुपये आपण मोजतो. मोठ मोठे शाळेत प्रवेश देण्यास आपण लाखो रुपये मोजत असतो. पण या अनाथ बेघर झोपडपट्टी मुलाला असे लाखो रुपये मोजता येत नाहीत यांच्याकडे येवढे पैसे पण नसतात. जे की पैसे देऊन आपल्या मुलाला शिक्षण देतील हे लोक लाखो किलोमीटर अंतर कापून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावो गावी जाऊन राहतात. याच्या सोबत याचे मूल पण असतात. हे लोक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी खेळणी भांडी ,भीक मागून , भविष्यवाणी बघून आपल्या कुटुबाच उदरनिर्वाह करतात. याच्या मुलाचे भविष्य काय याचं यांना काहीही घेणं देणं नाही . याचे भविष्य पूर्ण अंधारात जात आहे. शिक्षण म्हणजे काय असते हे यांना काहीच माहिती नाही. यांना काहीतरी वाचता यावे , लिहता यावं, शिक्षणाच महत्व समजावं " खरच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.
जो कुणी पियल तो घुरघूरल्याशिवाय राहणार नाही." त्याचमुळे उत्तम पाईकराव सरांनी गेले ३ वर्षा पासून या अनाथ बेघर झोपटपट्टी तील लेकरांना शिक्षणाचे दूध पाजण्याचे काम करत आहे . सरांची माहिती . उत्तम दिगंबरा पाईकराव. हिमायतनगर तालुक्या तील टाकराळा ह्या छ्योट्यासा गावातील आहे. पाईकराव सर हे पार्ट टाईम जॉब करून या मुलाला शिकवण्याचे काम करत आहे. शिक्षणाची सावली( एक ही रुपये न घेता) या शाळेत गेले ३ वर्षें झाले त्यांच्या अमूल्य वेळेत ला वेळ काढून त्यांनी मुलें दिसतील तिथं शाळा चालू करुन शिक्षणाचे धडे देत आहे. पण शाळेला, विद्यार्थीला शैक्षणिक साहित्याची खुप खुप गरज आहे . ज्यांना ज्यांना कुणाला जशा होईल तशी मदत करायची इच्छा असेल तर आपण मदत करु शकता . आपल्या छोट्याशा मदती मूळे या मुलांच आयुष्य बदलेल. आपण पाईकराव सरांशी जरूर संपर्क साधावा 8806917765 आपली मदत अनाथ बेघर शिक्षणापासून वंचित राहणारे चिमुकल्यांना आपल्या मदतीमुळे शिक्षणाचा दूध मिळेल जरूर संपर्क साधावा.