पळसपुर येथे डेंग रूग्ण आढळल्याने नागरीकात भितीचे वातावरण
हिमायतनगर, कल्याण वानखेडे। पळसपुर येथे डेंग रूग्ण आडळ्याणे शासकीय रुग्णालयांची टिम पळसपुर मध्ये दाखल त्यांनी लोकांची जनजागृती केली डेंग का होतेय हि माहिती नागरिकांना दिली या मध्ये आशावर्कर शारदा वानखेडे, डॉ गोविंद वानखेडे डोकळे साहेब व शासकीय रुग्णालयांची सर्व टिम होती त्यांनी खालील प्रमाणे मार्गदर्शन केले आहे डेंगू हा विषाणूजन्य म्हणजेच व्हायरल प्रकारचा आजार आहे. डेंगू आजारालाच डेंगी अथवा डेंग्यू चा ताप असे सुद्धा संबोधतात. डेंग्यूचा विषाणू म्हणजेच व्हायरस हा एडिस इजिप्ती ह्या प्रकारच्या डासांमार्फत पसरतो. म्हणजे डेंगू असलेल्या रुग्णाला चावलेला डास जेव्हा निरोगी व्यक्तीस चावतो तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा डेंगूची लागण होते.
हे डास दिवस चवणारे असतात. ह्या डासांची उत्पत्ती साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. विषाणू बाधित डासानी चावा घेतल्यानंतर डेंग्यूची लक्षणे साधारणतः पाच ते सात दिवसांमध्ये दिसू लागतात. डेंग्यूची सर्वसाधारण लक्षणं म्हणजे अधिक तीव्रतेचा ताप (हाय ग्रेड फिवर), डोळे आणि डोके दुखी, अंगदुखी, अशक्तपणा, तोंडाला कोरड पडणे, उलट्या होणे, त्वचेवर लाल व्रण उठणे. ह्याव्यतिरिक्त कमी तीव्रतेची लक्षणं, जसे उचक्या लागणे, तळहात आणि तळपायांना खाज येणे, भूक कमी लागणे किंवा मळमळणे इत्यादी दिसून येऊ शकतात.
डेंगूची गंभीर स्वरूपाची लक्षणे पुढील प्रमाणे असतात: हिरड्यांमधून अथवा नाकातून रक्तस्त्राव होणे, आतड्यांमध्ये रक्तस्त्राव होणे व तो काळ्या विष्टेच्या स्वरूपात बाहेर पडणे, प्रचंड अशक्तपणा येऊन भोवळ येणे.
डेंगूच्या आजारात रक्तातील प्लेटलेट पेशी (रक्त गोठवण्यात मदत करणाऱ्या रक्त कणिका) कमी होत असतात हे सर्वज्ञात आहे. विशेषतः ताप गेल्यानंतर प्लेटलेट पेशी कमी होण्यास सुरुवात होते. साधारणतः चार ते पाच दिवसात पेशी वाढायला सुरुवात होते. प्लेटलेट कमी होणे हेच एक डेंगू च्या तीव्रतेचे लक्षण नाही. बीपी कमी होणे, हात-पाय थंड पडणे, लघवी कमी होणे, किंवा पोटात दुखणे ही गंभीरतेची लक्षणे असतात. प्लेटलेट वाढणे हे मुख्यत्वे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते.
प्लेटलेट पेशी वीस हजारापेक्षा कमी होत असल्यास ट्रान्सफ्यूस म्हणजे ब्लड बँकेतून मागवून रुग्णास चढवाव्या लागतात. प्लेटलेट पेशींची संख्या जास्त असूनही रक्त स्रावाची लक्षणे असल्यास डॉक्टर प्लेटलेट ट्रान्सफ्यूस करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्लेटलेट ट्रान्सफ्यूस करणे हा रक्तस्त्रावाचा धोका टाळण्याचा तात्पुरता उपाय आहे..
काही प्रतिबंधात्मक उपायांची माहिती आपण जाणून घेऊया. रात्री झोपताना डास चावू नयेत म्हणून जाळी किंवा मच्छरदाणीचा वापर नक्की करावा. त्यामुळे डास चावण्याची चिंता नाही आणि झोपमोडही होत नाही, कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित राहतं.डेंग्यू पासून बचावाचे कोणते मार्ग आहेत. जर तुम्हाला डेंग्यू पासून वाचायचे आहे तर तुमचे घर स्वच्छ ठेवा. डेंग्यूचे डास सकाळी किंवा संध्याकाळी जास्त सक्रिय असतात. त्यामुळे या वेळी बाहेर जाणे टाळा. आपली त्वचा झाकून ठेवा. एडीस प्रजातीचा डास स्वच्छ आणि अस्वच्छ पाण्यात पैदास करतो म्हणून पाण्याचे पात्र किंवा टाकी हि माहिती डॉक्टर गोविंद वानखेडे यांनी दिली आहे.