मतदारानी आपले आधार कार्ड मतदान कार्डला लिंक करून घ्यावे- म. मुबशिर -NNL


धर्माबाद|
भारत निवडणूक आयोगाने १ ऑगस्ट पासून मतदार ओळखपत्र ला आधार कार्ड लिंक करण्याबाबत घोषित केलेले आहे. त्यानुसार मतदार ओळखपत्र आधार कार्डची लिंक करण्यासाठी वेगवेगळे माध्यमे निवडणूक आयोगामार्फत पुरविण्यात आलेली आहेत स्वतःचे आधार कार्ड मतदान कार्डाला लिंक करून जनतेस आपले आधार कार्ड मतदान कार्डाला लिंक करण्याचे आवाहन ऑल इंडिया तंजीम ए इंसाफ चे शहर अध्यक्ष व पत्रकार म. मुबशिर यांनी केले आहे.

मतदारांनी आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये वोटर हेल्पलाइन हे ॲप्लिकेशन घेऊन स्वतः मतदार आधार लिंक करू शकतात किंवा भारत निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in या वेबसाईटवर जाऊन नमुना सहा ब चा अर्ज भरून सुद्धा मतदार आधार लिंक करू शकतात किंवा वोटर पोर्टल याद्वारे सुद्धा मतदार स्वतः आधार लिंक करू शकतात. मतदारांना आपले स्वतःचे मतदान कार्ड आधार कार्डशी स्वतः लिंक करता येत नसेल तर आपल्या गावातील ग्राहक सेवा केंद्रामार्फत किंवा कोणत्याही कॉम्प्युटर सेंटर वरून आधार लिंक करता येईल त्यासाठी केवळ आपण आपले मतदान कार्ड व आधार कार्ड घेऊन जवळच्या कॉम्प्युटर केंद्रास भेट द्यावी. 

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मतदार नोंदणी मतदार यादीतील दुरुस्ती मतदार याद्यांचे प्रमाणीकरण हे सर्व कामे करण्याकरिता गरुडा हे ॲप्लिकेशन भारत निवडणूक आयोगामार्फत पुरविण्यात आले आहे. मतदारांना आपले आधार कार्ड स्वतः लिंक करता येत नसल्यास मतदारांनी आपल्या गावाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या बीएलओ यांच्याशी सुद्धा संपर्क करावा.मतदारांना त्यांच्या स्वतःच्या मतदान केंद्राकरिता कोणता बीएलओ निवडणूक आयोगामार्फत नियुक्त करण्यात आलेला आहे हे घरबसल्या एका क्लिकवर शोधता येऊ शकते. 

त्यासाठी www.nvsp.in या वेबसाईटवर जाऊन KNOW YOUR या विंडोवर क्लिक करावे.आपल्या घरातील कोणत्याही एका मतदाराचे मतदान कार्डाचा क्रमांक टाकून शोध घ्यावा,लगेच आपणास आपल्या मतदान केंद्राकरिता नियुक्त असलेला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे नाव व मोबाइल क्रमांक मिळेल. आपण संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून आपले आधार कार्ड लिंक करून घेऊ शकता. मतदार संघातील सर्व मतदारांनी आपले आधार कार्ड आजच मतदान कार्डाला लिंक करून प्रशासनास सहकार्य करावे.तसेच मतदार यादीच्या प्रमाणीकरणा करिता आपण हातभार लावावा असे आवाहन ऑल इंडिया तंजीम ए इंसाफ चे शहर अध्यक्ष व पत्रकार म. मुबशिर यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी