नांदेड| शहरात भरलेल्या पाचव्या फुले आंबेडकर साहित्य संमेलनात जवळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सहशिक्षक संतोष घटकार यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी संमेलनाध्यक्ष अनिल मोरे, उद्घाटक भदंत पंय्याबोधी थेरो, त्यांचा भिक्खू संघ राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर, प्रमुख अतिथी साहित्यिक डॉ. राम वाघमारे, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. सा. द. सोनसळे, विवेक काटीकर, यशवंत मनोहर प्रतिष्ठान नागपूरचे अध्यक्ष प्रशांत वंजारे, निमंत्रक तुकाराम टोंपे, काव्य पौर्णिमा अध्यक्ष दिगंबर कानोले, मुख्य संयोजक अशोक मल्हारे, सहसंयोजक प्रभू ढवळे, संयोजन समितीचे अध्यक्ष मारोती कदम, उपाध्यक्ष डॉ. गजानन देवकर, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, नंदा तेलंगे यांची उपस्थिती होती.