हिमायतनगर तालुक्यात पुन्हा चोरट्यांचे कारनामे; गणेशवाडी तांडा येथील दोन घरी चोरी -NNL

सोने-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रक्कम मिळून ७१ हजार २०० ची झाली चोरी 


हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे वडगाव जवळच्या गणेशवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरात शिरून दागिने सोने चांदी, उसाच लोन घेतली रक्कम मिळून अंदाजे ७० हजाराचा मुद्देमाल व अन्य एका घरातून १२०० रुपये असा ७१ हजार २०० ची चोरी केला आहे. याबाबत माधवराव जाधव वय ५५ वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक भुसनुर, अतुल राचाटवार, जमादार रंगराव राठोड यांनी भेट देऊन पाहणी व स्थळ पंचनामा केली. तसेच परिसरात चौकशी केल्यानंतर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मागील काही महिन्यापासून हिमायतनगर शहर व तालुक्यात चोरीच्या घटना सुरूच आहेत तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील मंदिराची दानपेटी फोडून लाखोंचा ऐवज लंपास केलेल्या घटनेचा तपास जैसे थेच असताना दि.२२ च्या रात्रीला हिमायतनगर शहरापासून ८ किमी अंतरावर असलेल्या तालुक्यातील मौजे  गणेशवाडी तांडा येथील शेतकऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यानी चोरी केल्याची घटना घडली आहे. शेतकरी कामानिमित्त बाहेर गावी गेला असताना अज्ञात चोरट्यानी घरातील कडीकोंडा कडून आत अशिराळे आणि शेतकऱ्याने घरात ठेवलेली लोखंडी पेटी चोरट्यांनी पळविली. चोरट्यानी चक्क पेटीतील नगदी २० हजार रुपये, ५ ग्रिम सोन्याचे झुंबर १२ हजार ५०० रुपये, सोन्याचे दीड तोळ्याचे नेकलेस ७ हजार ५०० रुपये आणि याचा भागातील इतर घर असलेल्या माधव बोडके यांच्या झोडपडीतील १२००  रुपये असा एकूण ७१ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला. आणि लोखंडी पेटी शेतांत टाकून चोरटे पसार झाले आहेत. 

या चोरीच्या घटनेमुळे शेती करून उदरनिर्वाह चालविनाऱ्या शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अगोदरच शेतकरी अतिवृष्टीच्या संकटाचा सामना करत असताना आता चोरट्यांच्या कारनाम्यामुळे हैराण झाला आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिक जागृत झाले असून, रात्रगस्ती करत आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावून नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी शहरासह ग्रामीण भागातील नागरीकातून केली जात आहे. या चोरीच्या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रंगराव राठोड हे करीत आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी