नांदेड| लायन्स क्लब नांदेड, केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन आणि शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत प्लास्टिक सर्जरी कॅम्पला रुग्णांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
दि १० सप्टेंबर रोजी या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटक म्हणून दक्षिण मतदार संघाचे आमदार मोहनराव हंबर्डे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री डीपी सावंत हे होते. महापौर जयश्रीताई पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरासाठी अमेरिकेहून आलेले डॉ शरद कुमार दीक्षित यांचे सहकारी डॉ राज लाला, डॉ ललिता लाला, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शंतनू कोटगिरे, लायन्स क्लब अध्यक्ष गंगाबिशन कांकर, प्रकल्प प्रमुख डॉ अशोक कदम हे उपस्थित होते.
मागील ३६ वर्षापासून हे शिबिर निरंतर चालू आहे. कोरोनामुळे मध्ये काही वर्ष शिबिर होऊ शकले नाही. या शिबिरामुळे गरजू रुग्णांना खूप फायदा होत आहे. या शिबिरामध्ये नाकावरील बाह्य विकृती, चेहऱ्यावरील डाग किंवा व्रण, दुभंगलेले ओठ, डोळयावर पडलेली पापणी व इतर त्वचेचे रोग यावर तपासणी करून शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. पूर्वी डॉ शरद कुमार दीक्षित यांच्या समवेत त्यांचे सहकारी म्हणून डॉ राज लाला हे येत होते. डॉ राजलाला हे अमेरिकेहून नांदेडला येण्यासाठी लागणारा खर्च ते स्वतः करीत असतात.
एक सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा देत असतात. आजच्या या शिबिरात नांदेड, लातूर, परभणी, नागपूर, बीड, परळी, तेलंगाना, कर्नाटक इथूनही रुग्ण आले होते. जवळपास आज ३०० रुग्णाची नोंद झाली आहे. यावेळी झेड.सी. डॉ मोतीलाल जांगिड, ममता व्यास, राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा मीना कांकर, सारिका मुंदडा, माहेश्वरी महिला मंडळाचे अध्यक्ष गीता झंवर, प्रतिभा राठी लायन्स क्लब सेंट्रल चे अध्यक्ष शिवानंद शिंदे, डॉ अमोल, अन्नपुरणाचे अध्यक्ष अरुण कुमार काबरा, सविता काबरा यांनी उपस्थिती यानी लावली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब सदस्य महेश भारतीया, अवधूत क्षीरसागर, सतीश देशमुख, शिवप्रसाद सुराणा, अभय माहेश्वरी, नित्यानंद मय्या, रमेश सारडा, दीपक रंगानानी, सरवर खान पठाण, राजेंद्र धूत, मनोज बिर्ला, अरुण तोष्णीवाल, संतोष देवसरकर, अविनाश रावळकर, बाबूलाल जांगिड, अख्तरभाई, अमोल बलदावा, सुनील भारतीया, राजेश काननखेडकर, आर के जैन, डॉ हंसराज वैद्य, डॉ लक्ष्मीकांत बजाज, डॉ मनोज कासलीवाल, डॉ प्रल्हाद राठोड, डॉ शरद माने हे अहोरात्र मेहनत घेत आहेत