हदगाव, शे चांदपाशा| हदगाव शहरातील गणेश मुर्तीचे विसर्जन शांतातेत पार पडले असुन, या मिरवणूकीत माजी खा. सुभाष वानखेडे आ. माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ.नागेश.पाटील..आष्टीकर व लोकनेते बाबूराव कदम कोहळीकर यांनी सहभाग घेतल्याने मिरवणूकीतील गणेश भक्तामध्ये उत्साहच वातावरण दिसुन आले.
काँग्रेस शिवसेना व भाजपा तर्फ स्वतंत्र पेडाँल टाकुन गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिका-याचे स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेस आमदार शिवसेनेचे माजी आमदार भाजपाचे पदाधिकारी आवर्जून उपस्थितीती दिसुन आली. माजी खा सुभाष वानखेडे यांनी माञ मिरवणूकीतील गणेश भक्तांना स्वतः शामिल होऊन प्रशासनाने दिलेल्या वेळाच्या आत विसर्जन करावे म्हणून तिथे जाऊन अहवान करतांना दिसुन आले.
विशेष म्हणजे ऐन गणेश ऊत्सवच्या पार्श्वभूमीवर हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक हनुमंत गायकवाड रजेवर असल्याने त्या जागी नव्यानेच रुजू झालेले पोलिस निरक्षक जगन्नाथ पवार यांनी पदभार घेतला आहे. परिणाम स्वरुप विसर्जन मिरवणूकच्या बाबतीत माञ योग्य ती माहीती प्रशासना कडुन मिळत नव्हती. कारण विसर्जनाच्या दिवशीच हदगाव शहराचा आठवडी बाजार होता. या बाबतीत स्थानिक प्रशासनाने फार उशीरा कळविल्यामुळे भाजीपाला व छोट्या व्यापा-याची तांरबळ उडाली होती.