नांदेड| बरबडा तालुका नायगाव येथील रहिवासी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरबडावाडी येथे कार्यरत असलेले सहशिक्षक अशोक तुकाराम जेठेवाड यांचे उपचारादरम्यान नांदेड येथे गुरुवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते ४८ वर्षाचे होते.
अशोक जेठेवाड हे विद्यार्थीप्रिय आणि उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची ख्याती होती. नायगाव पंचायत समितीने त्यांना नुकतेच गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. अशोक जेठेवाड गुरुजी यांच्या पार्थिवावर दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी यश नगरी युनिट दोनच्या बाजूला असलेले यशश्री नगर ते मोरचौक मार्गे निघणार आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी,मुले असा परिवार आहे.