मुखेड, रणजित जामखेडकर| पुढील काळात पक्षाची एकनिष्ठता संघटन वाढवून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत भरभरून यश पक्षाला प्राप्त करून दयावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष मा. हरिहरराव भोसीकर यांनी मुखेड येथील पक्ष नोंदणी व तालूका आढावा बैठकीत केले.
पक्ष कार्यालय मुखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सभासद नोंदणी व मुखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचा आढावा व पक्ष सदस्य नोंदणी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाजिल्हाअध्यक्ष हरिहरराव भोसीकर हे होते तर कार्यक्रमाचे प्रास्तविक मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष व मार्गदर्शक शिवाजीराव जाधव यांनी पक्ष नोंदणी व राष्ट्रवादीचे संघटन वाढवून पुनश्च मुखेड तालुका राष्ट्रवादीमय करण्याचे मनोदय व्यक्त केले.
यावेळी मुखेड पक्ष निरीक्षक गजानन पांपटवार, महिला जिल्हाअध्यक्ष प्रांजलीताई रावणगावकर, रा.युवती कॉ.जिल्हाअध्यक्ष प्रियंकाताई कैवारे, रा.युवक कॉ.जिल्हाकार्याध्यक्ष संभाजी मुकनर, रा.विद्यार्थी कॉ.अंजियक देशमुख,प्रा. डी.बी.जाबरूनकर, सुभाष गायकवाड, विशंभर भोसीकर, प्रियंका मुटकुले यांची प्रमुख उपस्थिती होती, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आले व मुखेड तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी यांची निवड करण्यात आली सूत्रसंचलन मुखेर शहर कार्याध्यक्ष जयभीम सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रा.युवती कॉ.च्या तालुका अध्यक्ष सौ. पंचवटीताई गोंडाळे यांनी केले.
यावेळी अशोकसेट मुक्कावार, सुनील मुक्कावार, शेख शादुल(होनवडजकर),सचिन देवकते, अँड. लक्षमण सोमवारे, अँड. भाग्यश्रीताई कासले,बालाजी चापेकर, दिनेश पाटील केरूरकर, कैलास मादसवाड, अशोक बचेवार,प्रताप चौधरी,युवराज चव्हाण, रमाकांत पाटील, अमोल पाटील गोजेगावकर, ऋषीकेश गोजेगावकर,नागनाथ गायकवाड, बाबा मणियार, मगदूम पठाण, वाजीत दापकेकर, पारुबाई मठवाले, आनंदा शिंपाळे,रवी रोडगे, संघर्ष गायकवाड, आदी सह पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.