दि. २७ सप्टें. ते ५ आक्टो. दरम्यान आरोग्य शिबीराचा लाभ- डॉ. मनुरकर
नांदेड| राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने नवरात्र महोत्सव अंतर्गत दि. २६ सप्टेंबर ते ५ आक्टोबर दरम्यान 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' आभियान राबविले जाते आहे. दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता स्री रुग्णालय श्याम नगर, नांदेड येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबीराचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर, जिल्हाधिकारी परदेशी, महापौर जयश्रीताई पावडे, अधिष्ठाता डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे, डॉ. ललीता मनुरकर ,डॉ. सुनील पल्लेवाड, डॉ. देशमुख, डॉ. मोहिनी पाटील (भोसीकर) उपस्थित होते . मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पुजन व दीपप्रज्वलन करुन रितसर शिबीराचे उदघाटन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात नांदेड शहरातील रुग्णांनी शिबीराचा लाभ घेतला.
रोगनिदान शिबीराचे उदघाटन मान्यवरांनी फीत कापुन केले. जि प मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर यांनी रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत पाहणी करून अभिनंदन केले. संचलन व आभार दिगंबर शिंदे यांनी मानले. निशुल्क आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललीता मनुरकर( सुस्कर) यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पल्लेवाड, डॉ. देशमुख, डॉ. मोहिनी पाटील ( भोसीकर) , डॉ. राम मुसांडे, डॉ. मधुकर हत्ते, डॉ. विजय बरडे, डॉ. प्रदीप केंद्रे, डॉ. तानाजी लवटे, डॉ. भास्कर आवटे, डॉ. सुवर्णा स्वामी, डॉ. प्रकाश गुरुतवाड , डॉ. मार्कंड आयनले, डॉ. अरविंद कांबळे, प्रशासकीय अधिकारी विठ्ठल भुसारे यांनी परीश्रम घेतले.