मालेगाव/नांदेड। राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण मालेगाव येथे एका खाजगी कार्यक्रमा निमित्त आल्यावर ग्रामपंचायतचे सदस्य मंगेश बुट्टे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
तसेच त्यांच्या समवेत नांदेड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती किशोर स्वामी यांची उपस्थिती होती या भेटीमध्ये मालेगावच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून दीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी काही विकासात्मक बाबींवर रामलिंग दूध डेरीचे माजी चेअरमन राजाभाऊ राजेवार यांनी लक्ष वेधले तसेच भविष्यातील मालेगावच्या विकासाचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे या दृष्टिकोनातून अशोकराव चव्हाण साहेब यांनी काही सूचना केल्या.
मालेगावातील कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तरी तो माझ्यासाठी पक्ष म्हणून नाही तर माझ्या गावचा व्यक्ती म्हणून महत्त्वाचा आहे असे उद्गार बैठकीमध्ये अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले यावेळी केशवराव ईंगोले,नागोराव ईंगोले, सदाशिवराव बुट्टे, जळबाजी गुट्टे बाबूराव राजेवार , केशवराव वारले ,किसन वलबे ,संभाजी केशेवार, नागेश देलमडे संदीप डाकुलगे नितीन चन्नेवार व भाजपचे युवा नेते उमाकांत राजेवार,प्रणव बुट्टे, उमेश बुट्टे,श्याम बुट्टे अनेकांची उपस्थिती होती.