डॉ. एस.आर. रंगनाथन यांची पंचसूत्री ……ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून डॉ.एस.आर रंगनाथन यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1892 तर 27 सप्टेंबर 1972 बेंगलोर येथे त्यांचे निधन झाले. 27 सप्टेंबर रोजी आज त्यांच्या स्मृतिदिनी मी एवढे सांगू इच्छितो की, भारतातच नाही तर जगामध्ये ग्रंथपालांना डॉ.एस.आर रंगनाथन यांच्या तत्त्वाचा अभ्यास करावाच लागतो. ग्रंथालय शास्त्र म्हटलं की डॉ. मेलविल डुई आणि डॉ.एस.आर रंगनाथन या दोघांचे नावे सर्वात आधी घेतली जातात. या स्मृतिदिनी मी डॉ.एस.आर रंगनाथ यांच्या इ.स.वी.सन 1932 रोजी त्यांनी पंचसूत्री सांगितली यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. ग्रंथालयांना जास्तीत जास्त लोकाभिमुख बनवणे त्यांचा फायदा सर्वसामान्य पर्यन्त व्हावा यासाठी त्यांनी ग्रंथालयाची पंचसूत्री तयार केली. त्या आधारावरच ग्रंथालय शास्त्राचा पाया रचला गेला असे मला वाटते.
आज भारतामध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये जी काही प्रगती झालेली दिसत आहे. त्यामध्ये सर्वाधिक मोठे योगदान म्हणजेच डॉ.एस.आर रंगनाथन यांचे होय. तर या लेखांमध्ये मी त्यांच्या पंचसूत्री बद्दल माहिती सांगणार आहे. (त्यांचा परिचय, शिक्षण वगैरे हे सर्वांना माहीत आहे.) असे समजून मी थोडक्यात त्यांच्या पंचसूत्रीचा प्रत्यक्ष ग्रंथालयामध्ये कशाप्रकारे उपयोग होतो हे तुम्हाला सांगतो. डॉ.एस. आर रंगनाथन यांनी 1931 मध्ये त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ फाईव लॉज ऑफ लायब्ररी सायन्स प्रसिद्ध झाला. भारतीय ग्रंथालयाची चौकट रंगनाथन यांनी दिलेल्या या पाच सिद्धांतावरच आहे. या पंचसूत्रीला कोणी नियम म्हणतात तर कोणी सिद्धांत असे देखील म्हणतात. या पंचसूत्रीचा प्रत्यक्षात ग्रंथालया मध्ये वरवर पाहता अत्यंत साधे वाटतात पण त्यामुळे भारताच्या ग्रंथालय शास्त्राला कलाटणी मिळाली. कारण सर्वसामान्य वाचकांचा विचार करून त्यांनी ही पंचसूत्री मांडली आहे.
माझे असे मत आहे की, ही पंचसूत्री ग्रंथालयाच्या दर्शनी भागामध्ये लावली पाहिजे. कारण वाचकाला याचा फायदा नक्कीच होईल डॉ.एस.आर रंगनाथन यांच्या या संशोधनाबद्दल असलेल्या त्यांना या दृष्टिकोनातून प्रॅग्मेटिक फिलॉसॉफर किंवा व्यवहारीक तत्त्वज्ञ असं म्हटलं जातं.
1)ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत.
2)प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे.
3)प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे.
4)वाचकाचा तसेच सेवकाचा वेळ वाचला पाहिजे.
5)ग्रंथालय ही वर वाधिष्णु संस्था आहे.
1)ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत. Books are for use –
ग्रंथ हे सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारे आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ग्रंथाचे महत्व अनन्य साधारण आहे.प्रत्येक व्यक्तीने वाचनाची आवड निर्माण करायला पाहिजे. जास्तीत जास्त वाचन केले तर त्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होईल. ग्रंथ हे सर्व जाती,धर्म,पंथ,लहान,मोठा मनुष्य असो या सर्वांसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. यामध्ये ग्रंथालयाची इमारत मध्यभागी असली पाहिजे. जेणेकरून वाचकाला सहज जाता येईल त्याचप्रमाणे ग्रंथालय हे मुक्त प्रवेश म्हणजेच ग्रंथालय मध्ये प्रत्येक ग्रंथापाशी जाण्याची परवानगी असली पाहिजे. त्यामुळे तो वाचक आपल्या आवडीची पुस्तके घेऊ शकेल. म्हणूनच डॉ.एस.आर रंगनाथ यांनी आपल्या पहिल्या सुत्रा मध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. की ग्रंथ हे उपयोगाची आहे.
2)प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. Every Reader His/Her Book
पृथ्वी तलावरील सर्व मानवाला म्हणजे लहान मोठे स्त्री,पुरुष मुले,मुली वयस्कर व्यक्तींना त्यांच्या आवडीचा ग्रंथ त्यांना मिळाला पाहिजे. ग्रंथालया मध्ये सर्व प्रकारची पुस्तके ही उपलब्ध केली पाहिजे. जर सार्वजनिक ग्रंथालय असेल तर गोष्टीची पुस्तके, आत्मचरित्र,विनोदी नाटक कादंबरी,वैद्यकीय, सामाजिक, राजनीती व आर्थिक या सर्व प्रकारचे ग्रंथ असले पाहिजे. जेणेकरून त्या त्या घटकातील वाचकाला त्याच्या आवडीचा ग्रंथ वाचायला मिळेल. व खऱ्या अर्थाने पंचसूत्रतील दुसऱ्या नियमांचे या ठिकाणी सार्थक होईल असे मला वाटते.
3)प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. Every Books its Reader
रंगनाथन यांनी तिसऱ्या सुत्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. की जेवढे काही ग्रंथ असतील त्या प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. यासाठी ग्रंथालयांमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ग्रंथालय हे मुक्त प्रवेश प्रणाली आसली पाहिजे. यासाठी ग्रंथपालाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे. सेवक वर्ग अद्यावत ठेवला पाहिजे. यामुळे ग्रंथ चोरीला जाणार नाही आणि प्रत्येक वाचकाला ग्रंथापाशी जायला सोपे होईल. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रंथाला योग्य वाचक मिळेल त्याचप्रमाणे ग्रंथपालाने ग्रंथ प्रदर्शन वाचन, दिन यासारखे कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे यामुळे प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळेल.
4)वाचकाचा तसेच सेवकाचा वेळ वाचला पाहिजे. Save the time of Reader
ग्रंथालय मध्ये वाचकाचा त्याचप्रमाणे सेवकाचा वेळ खूप महत्त्वाचा असतो. तोवेळ वाचवणे आवश्यक आहे यासाठी ग्रंथालयातील ग्रंथपालांनी या ठिकाणी ग्रंथालय हे मुक्त प्रवेश असावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यामुळे वाचकाचा व सेवकांचा वेळ नक्कीच वाचेल. त्याचप्रमाणे वर्गीकरण पद्धती ही देखील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यामध्ये जर विषयानुसार कॅटलोगिंग असेल तर वाचक आणि सेवकाला ग्रंथ शोधण्यासाठी सोपे जाईल. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन ग्रंथालय मध्ये ओ पॅक नावाची सुविधा असली पाहिजे. यामुळे जो आपल्याला ग्रंथ पाहिजे तो कुठे आहे हे काही सेकंदांमध्येच कळेळ यामुळे वाचकाचा वेळ नक्कीच वाचेल हेच डॉ.एस.आर रंगनाथन यांनी आपल्या चौथ्या सूत्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
5)ग्रंथालय ही वधिष्णु संस्था आहे. Library is a growing origination
ग्रंथालय हे निरंतर वाढणारी संस्था आहे. काळानुसार ग्रंथालय मध्ये ग्रंथ संग्रह, वाचक, इमारत,कर्मचारी हे सर्व घटक सतत वाढणारे आहे. म्हणूनच म्हणतात ग्रंथालय ही वर्धिष्णु संस्था आहे. ग्रंथालयाचा सतत विकास होत असतो. ग्रंथालयामध्ये दरवर्षी ग्रंथांची संख्या वाढत जाते. त्याचप्रमाणे वाचक वाढतात. विविध कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील होत असते. खरंच डॉ.एस.आर रंगनाथन यांनी आपल्या पाचव्या सूत्रामध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. की, ग्रंथालय ही वर्धिष्णु संस्था आहे. खरोखरच वाचक आणि ग्रंथपाल,ग्रंथालयातील सेवक यासाठी ही पंचसूत्री खूप महत्त्वाची आहे असे मला वाटते.
सर्वप्रथम हा लेख लिहिण्याचा योग हा मला डॉ.जगदीश कुलकर्णी सरांमुळे आला आसे मला वाटते कारण आज सकाळी मोबाईल हातात घेतल्यावर सरांचे स्टेटस पाहिले. यामध्ये नांदेड एकजूट या वर्तमानपत्रां मध्ये सरांचा लेख पाहिला व वाचन केला हा लेख वाचल्याबरोबर आपणही काहीतरी लिहूया असे वाटले. आणि कॉलेजला गेल्यावरती डॉ.एस.आर रंगनाथ त्यांच्या पंचसूत्री बद्दल मी थोडक्यात माझा लेख लिहिला या सर्व लेखाचे श्रेय मी डॉ.जगदीश कुलकर्णी सरांना देऊ इच्छितो आणि त्यांचे मनापासून अभिनंदन व आभार व्यक्त करतो.
...बोंबले राजू बालासाहेब, हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर, ग्रंथपाल