भूमीहीन, अल्पभूधारक,गरिब निराधार, विधवा, वयोवृद्ध नागरिकांना २१ हजार रुपयाचे उत्पन्न प्रमाणपत्र तात्काळ द्यावे - शंकर अण्णा वडेवार
मुखेड, रणजित जामखेडकर| संजय गांधी , श्रावणबाळ, राज्यनिवृत्ती,इंदिरा गांधी विधवा, वृध्दापकाळ यासह विविध निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी निराधारांना २१ हजारांचे उत्पन्न प्रमाणपत्र लागते परंतु मुखेड तहसील कार्यालयातून २१ हजाराचे उत्पन्न मिळतच नाही यामुळे अनेक निराधारांना योजनेसाठी पात्र असुनही उत्पन्न प्रमाणपत्राविना योजनेपासून वंचित राहव लागत आहेत.
मुखेड तहसील कार्यालयातून गेल्या १ महिन्यापासून सदरील उत्पन्न प्रमाणपत्र देणे बंद केले आहे.मुखेड तालुका सोडून जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यामध्ये २१ हजाराचे उत्पन्न प्रमाणपत्र मिळत आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी यांचा पंचनामा अहवालावरून २१ हजाराचे उत्पन्न प्रमाणपत्र देण्यात यावे व त्याच्या नियमबाह्य जाचक अटी रद्द करून तालुक्यातील भूमिहीन, अल्पभूधारक, शेतमजूर, विधवा, वयोवृद्ध नागरिकांवर होणारे अन्याय थांबवून न्याय द्यावा.
या मागणीकडे जर प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या वतीने दि.११ आक्टोंबर रोजी तहसील कार्यालयावर निराधारांचा धडक आक्रोश मोर्चा काढण्यात येईल अशा इशाऱ्यांचे निवेदन मुखेडचे तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे मुखेड प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष जनसेवक शंकर अण्णा,शहराध्यक्ष साईनाथ बोईनवाड, तालुकाध्यक्ष सतिष शिंदे, महिला शहराध्यक्ष अरूणाताई पोतदार, शिववाख्याते बजरंग पा.पाळेकर, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष गोपाळ पाटील जाहुरकर, व्यकंट हिवराळे,योगेश हिवराळे,यांच्या सह तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.