अर्धापुर| तालुक्यातील पार्डी (म)येथे राजमाता जिजाऊ अभियान अंतर्गत पोषण आहार पंधरवडा उपक्रम राबविण्यात आले असून हा उपक्रम १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत सुरू राहणार आहे .या उपक्रमात अंगणवाडी सेविका ,मदतनीस ,आरोग्य विभागाने कर्मचारी ,जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका व विद्यार्थ्यांचा सहभागी आहेत .
दि .२२ सप्टेंबर रोजी पार्डी म .राष्ट्रीय पोषण आहार पंधरवडा अभियानांतर्गत वरिष्ठ अधिकारी ऐश्वर्या लोणीकर ,बालविकास प्रकल्प अधिकारी मुतखडे ,विस्तार अधिकारी जामोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोषण आहार पंधरवडा अभियाना सुरुवात करण्यात आली .यामध्ये प्रामुख्याने सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली सुदृढ बालकाला वरिष्ठ अधिकारी लोणीकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
तसेच किशोरवयीन मुलीचे सक्षमीकरण मार्गदर्शन करण्यात आले ,किशोरवयीन मुलींना आहार आरोग्य वयक्तिक स्वच्छता बालविवाह या विषयी माहिती देण्यात आली .कुपोषित बालकाविषयी माहिती देऊन बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराविषयी माहिती सांगण्यात आले .
यावेळी सरपंच जिजाबाई कांबळे यांनी प्रमुख उपस्थिती होती .तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका उषा गळगिरे यांनी केले .यावेळी नामदेव भोसले , मंगला सलामे ,आरोग्य अधिकारी पल्लवी फिसके ,स्वाती खरटमोल ,एल .एस .वाखरडे ,शेळके व अंगणवाडी सेविका लता दाढेल ,रेखा सूर्यवंशी ,नमिता जोगदंड ,मंदा नरोटे ,स्वाती कांबळे ,अंगणवाडी मदतनीस सरस्वती खंडागळे ,द्रौपदा वाघमारे ,रब्बानी नदाफ ,रोमा मदिने ,सयाबाई हुपाडे ,आशा वर्कर सरस्वती पारदे , गुणाबाई कांबळे ,माया कांबळे सह माता -किशोरवयीन मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंदाबाई नरोटे यांनी केले .