अनेक मान्यवरांच्या पुरस्कार देऊन गौरव, उत्कृष्ट गणेश मंडळ व उत्कृष्ट सेवा देणारे अधिकारी यांचा गौरव
अर्धापूर, निळकंठ मदने| तालूक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांची नोंद घेऊन सन्मान करण्याचे कार्य पत्रकार संघाचे उल्लेखनीय असून असेच समाजीक कार्य पत्रकारांनी सुरू ठेवावे अशे आवाहन पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी अध्यक्षीय भाषणात केले आहे.
अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्री गणेश उत्सव काळात सुंदर देखावे करून शिस्तीचे पालन करणाऱ्या अर्धापूर शहरातील व ग्रामीण भागातील प्रत्येक एक गणेश मंडळास व प्रशासनातर्फे उत्कृष्ट सेवा प्रदान करणाऱ्या विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहन पर पुरस्कार वितरण सोहळा दि.२० मंगळवार रोजी मातोश्री मंगल कार्यालय अर्धापूर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे प्रमुख उपस्थितीत तहसीलदार उज्वला पांगरकर, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, बजरंग दलाचे प्रांत प्रमुख कृष्णा देशमुख,
उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुस्वीर खतीब, पोनि.अशोक जाधव,अधीक्षक मदनकुमार डाके, जिल्हाध्यक्ष पप्पू कोंढेकर, जिल्हा चिटणीस डॉ.लक्ष्मण इंगोले,गटनेते बाबुराव लंगडे,माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण, शहराध्यक्ष राजू शेटे,पोउनि बळीराम राठोड,पोउनि.कपील आगलावे,पोउनि.साईनाथ सुरवशे, नगरसेवक मुक्तेदरखान पठाण, सोनाजी सरोदे,चेअरमन प्रविण देशमुख,तालुकाउपाध्यक्ष प्रल्हादराव माटे, शहराध्यक्ष विलास साबळे, यांच्या उपस्थितीत उल्लेखनीय कार्य करणारे डॉ प्रफुल्ल राठोड, डॉ.नितीन हाके,डॉ ओमप्रकाश जडे,सहाय्यक अभियंता नागेश खिल्लारे,श्रीगणेश उत्सवात विविध देखावे सादर करणारे दत्ता जडे,विना वाद्य विसर्जन करणारे आनंद क्षीरसागर,विविध कार्यक्रम घेणारे विलास कापसे, संगित क्षेत्र प्रा.तानाजी मेटकर,बाल पुरस्कार अभिनंदन सचिन राहटकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलतांना पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे म्हणाले की तालुका पत्रकार संघाने निराधार गरजू कुटुंबीयांना मदतीसाठी नेहमीच तत्परतेने धाऊन जाऊन मदत केली तसेच श्रीगणेश उत्सवात पोलीस प्रशासनाने जिल्हात प्रथम विसर्जन शांततेत पार पाडल्या बद्दल गौरव करणाऱ्या पत्रकार संघाचे कार्य दखल घेण्यासारखे असल्याचा उल्लेख पोअ.शेवाळे यांनी केले आहे.तहसीलदार उज्वला पांगरकर म्हणाला की पत्रकारांनी जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्भीड पणे प्रश्न मांडून सोडवणूक करण्यासाठी पाठपूरावा करत राहावा जेणे करून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळेल अशे वक्तव्य पांगरकर यांनी केले आहे.
यावेळी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे,डॉ प्रफुल्ल राठोड यांची समोचीत भाषणे झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष फिरदोस हुसेनी यांनी केले तर सुत्रसंचालन सचिव निळकंठराव मदने यांनी केले व आभार पत्रकार सखाराम क्षीरसागर यांनी मानले सोहळा यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष ओमप्रकाश पत्रे, कार्याध्यक्ष उदयकुमार गुंजकर,सचिव संजय इंगोले,शरद वाघमारे,राजु देशमुख, अजित गट्टाणी, सल्लागार शंकरराव कंगारे, आनंद मोरे,गुणवंत सरोदे,फिरदोस पठाण,जयप्रकाश गट्टाणी यांनी परिश्रम घेतले यावेळी छगन पाटील सांगोळे,तालुका प्रमुख रमेश क्षीरसागर अशोक डांगे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष जठन मुळे,शहरप्रमुख सचिन येवले,व्हाईस चेअरमन रशीदोद्दीन काजी, व्यंकटी राऊत, अँड. योगेश माटे, सय्यद मोहसीन,माजी सरपंच ईसुब पटेल,शेरू पठाण,सरचिटणीस तुळशीराम बंडाळे,वैभव माटे, तालुकाध्यक्ष अब्दुल्ला खान पठाण, कुश भांगे,सोशल मीडियाचे शेख रफिक,आनंद जडे,लक्ष्मण मुधळे, लक्ष्मणराव धुळगंडे, नरोटे, डॉ.सौ.हाके, महिला तालुकाध्यक्ष वर्षाताई बंडाळे,सौ.सुवर्णा हडपकर , लक्ष्मणराव धुळगंडे, रमेश गीरी,माजी सैनिक माधव माटे, गोविंद माटे,गौसमुल्ला,यांच्या सह अनेक जन उपस्थितीत होते.