पिंपळकुंठा ग्रामपंचायतीवर जनसेवक पांडुरंग पाटील गोपनर यांची सलग तिसऱ्यांदा " हैट्रीक "
मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा निकाल काल तहसील कार्यालयात घोषित करण्यात आला.
यामध्ये तालुक्यातील मौजे पिंपळकुठा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी " एकच ध्यास गावचा विकास " हे ब्रिदवाक्य घेऊन जनसेवक पांडुरंग पा.गोपनर हे मागील १५ वर्षांपासून पिंपळुठा गावातील जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करतात यांची पावती म्हणूनच आज ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत जय मल्हार ग्रामविकास पॅनल पिंपळकुठा या पॅनेलचा प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय झाला आहे.
या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवार सौ. रेखाताई पांडुरंग पाटील गोपनर हे प्रचंड मताधिक्याने थेट सरपंच पदी निवडुण आले तर ग्रा.प.सदस्य म्हणून गोपनर सुलोचना व्यंकटराव, गोपनर बालाजी बाबाराव, गुबनर कमलबाई मनोहर,नाल्लापल्ले स्वातिका माधव,जांभळे अच्युत विठ्ठलराव, पवार शंकर चंदु, हे प्रचंड मताधिक्याने पुर्ण बहुमताने विजयी झाले आहेत.
पॅनेल प्रमुख पांडुरंग पाटील गोपनर आणी जयवंतराव तरंगे यांनी " ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी आम्ही लढतो जनतेसाठी " हे घोषवाक्य देऊन गावात केलेल्या विकास कामांच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करून प्रतिस्पर्धी उमेदवारांना दे धक्का देत आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. सरपंचपदी सौ.रेखाताई पांडुरंग पाटील गोपनर यांच्या सह सर्व पॅनेलच्या विजयी उमेदवारांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .