नांदेड| संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यात लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लोहा तालुक्यातील गावांच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांकडून व अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांकडून लम्पी त्वचा रोगाचा आजार आढळून येत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.प्रणिता ताई देवरे -चिखलीकर ह्या स्वतः प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यासाठी त्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामध्ये भेट देऊन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अरविंद गायकवाड यांची भेट घेऊन आढावा घेतला.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय तसेच गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास केल्या व प्रशासनाने कर्मचारी मनुष्यबळ संख्या कमी असल्यास तात्काळ कर्मचारी संख्या वाढवावी अशी निर्देश त्यांनी यावेळी दिला.
नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यात लम्पी आजाराचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे पशुपालकांनी जागरूक राहून आपल्या पशुधनाची काळजी घेऊन वेळेवर लसीकरण करून घ्यावे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून या आजाराचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो. या आजारात प्रथम उपाययोजना म्हणून गोठ्यामध्ये लम्पी त्वचा विषाणूजन्य प्रतिबंधक औषधांची फवारणी जवळील पशुवैद्यकीय केंद्रात कळवून मोफत करून घ्यावी असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
पशुपालकांनी सतर्क रहात जनावरांना ताप येणे,डोळे व नाकातून स्त्राव गळणे,अंगावर गाठी येणे. पायांना सूज येणे, चारा न खाणे,दूध कमी देणे अशी लम्पी त्वचा रोगाची लक्षणे आढळून आल्यानंतर याबाबतची माहिती प्रशासनाला सांगावी असे जिल्हा परिषद संवर्धन अधिकारी अरविंद गायकवाड यांनी आवाहन केले. यावेळी लोहा भाजपा तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील ढाकणीकर माजी सरपंच शंकरराव ढगे,बंडू पाटील वडगावकर उपसरपंच साईनाथ पाटील टर्के पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषद येथील कर्मचारी उपस्थित होते.