नांदेड| देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महानगर नांदेड तर्फे सुरू असलेल्या सेवा पंधरवड्या अंतर्गत संध्या छाया वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकां समवेत स्नेहभोजन घेऊन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी वाढदिवस साजरा केला.
सेवा पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली 2 ऑक्टोबर पर्यंत घेण्यात येत आहेत. सोमवारी संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर प्रवीण साले, संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धनेगावकर, जिल्हाचिटणीस ॲड. अभिलाष नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला संध्याछाया वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक विक्रम टरके पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. सेवा पंधरवड्याचे संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून हा कार्यक्रम घेण्या मागचा उद्देश स्पष्ट केला.
वृद्धांसोबत हितगुज करताना प्रवीण साले यांनी असे सांगितले की, जगात भारताची मान उंचावणाऱ्या नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शंभर कोटी जनता परमेश्वराकडे प्रार्थना करत आहेत.ॲड. नाईक यांनी नांदेड मध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचलन विजय गंभीरे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक धनेगावकर यांनी केले. आश्रमातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मोदी यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. सेवा पंधरवडयात नागरिकांनी देखील सेवा प्रकल्प राबवून नरेंद्र मोदी यांच्या बद्दलची आत्मीयता दाखवून द्यावी असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस दिलीप ठाकूर यांनी केले आहे.