स. सतपालसिंघ कामठेकर यांना एम.फील. प्रदान -NNL

विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची कास धरावी-  बाबा ज्योतींदरसिंघजी  ग्रंथी


नांदेड।
विद्यार्थ्यांनी संकुचित शिक्षणात समाधानी न राहता, उच्च शिक्षणाची कास धरणे आवश्यक असल्याचे मत सचखंड गुरुद्वाराचे मीत जत्थेदार संत बाबा ज्योतींदरसिंघजी ग्रंथी यांनी व्यक्त केले. स.सतपालसिंघ मनमोहनसिंघ कामठेकर यांना एम.फील. पदवी प्रदान करण्यात आल्याने, त्यांचा बाबा ज्योतींदरसिंघजी ग्रंथी आणि श्री दशमेश ज्योत स्कूल यांच्यावतीने गौरव करताना ते बोलत होते.

लवकरात लवकर आपण पीएच.डी. पूर्ण करावी असा आशिर्वादही बाबा ज्योतींदरसिंघजी यांनी यावेळी स.सतपाल सिंघ कामठेकर यांना दिला.यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव स.सुरेंद्रसिंघ अजायबसिंघ ,माजी सचिव स. रणजितसिंघ कामठेकर ,स.जगजीतसिंघ चिरागिया, स.रणजितसिंघ चिरागिया,स.छगनसिंघ कामठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने स. सतपालसिंघ स. मनमोहनसिंघ कामठेकर यांना नुकतीच एम.फिल. पदवी प्रदान केली.


स. सतपालसिंग कामठेकर हे एम.ए.( हिंदी) बी.एड असून, त्यांनी पीपल्स कॉलेज  नांदेडच्या हिंदी विभागातील प्रा. डॉ. मुकुंद कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली "श्री गुरू गोबिंदसिंघजी तथा उनके दरबारी कवियों के काव्य का समीक्षात्मक अनुशीलन" या विषयावर आपले संशोधन कार्य पूर्ण केले.या संशोधन कार्यात स. सतपालसिंघ  कामठेकरांना मार्गदर्शक डॉ. मुकुंद कवडे यांच्याबरोबरच मीत जत्थेदार बाबा ज्योतींदरसिंघजी ग्रंथी, प्राचार्य राम जाधव,डॉ. भगवान जाधव, डॉ. घोडगे, डॉ. वर्षा मोरे (पावडे), डॉ. वानखेडे, यादव मॅडम,सौ. बबीताकौर चाहेल (ग्रंथपाल) आदींचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

यावेळी स. सतपालसिंघ  कामठेकर यांच्या बाबतीत तीन गोष्टींचा मान्यवरांनी आवर्जून उल्लेख केला. स.सतपालसिंघ कामठेकर हे श्री गुरु गोबिंदसिंघजींच्या दरबारी कवींच्या संदर्भात संशोधन करणारे महाराष्ट्रातील पहिले मानकरी ठरले आहेत. स. सतपालसिंघ  हे एम. एस. ई. बी,मध्ये नोकरीस असून, त्यांनी आपले कर्तव्य निष्ठेने  पार पाडत आपले संशोधन कार्य पूर्ण केले, तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे एम. एस. ई. बी. मध्ये नोकरी  करत, एम. फील. पदवी मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले  संशोधक ठरले. स.सतपालसिंघ कामठेकर हे कामठा बुद्रुक येथील मूळचे रहिवासी असून, राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष तथा  सामाजिक कार्यकर्ते स. रणजीतसिंघ  कामठेकर यांचे पुतणे आहेत. स. सतपालसिंघ  यांचे कामठा वासियांतर्फे आणि समस्त बांधवांतर्फे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी