स्व.गंगाधरराव पांपटवार जीवनगौरव पुरस्काराचे 16 सप्टेंबर रोजी वितरण -NNL

 जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई केशवराव धोंडगे, भु.द.वाडीकर, अनिल कसबे, शिवानंद टाकसाळे, कविता जोशी, नंदकुमार गादेवार, नितीन जोशी मानकरी


नांदेड|
स्व. गंगाधररावजी पांपटवार जयंती महोत्सव व टीचर्स क्लब रुग्णालय व स्व. गंगाधरराव पांपटवार वैद्यकीय सहकारी संस्थेच्या  वर्धापन दिनाच्या  औचित्याने नांदेड येथील कुसुम सभागृहात दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष श्रीपाल सबनीस हे प्रमुख अतिथी तर माधवराव पाटील शेळगावकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. या सोहळ्यात  जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई केशवराव धोंडगे, भु.द.वाडीकर, अनिल कसबे, शिवानंद टाकसाळे, कविता जोशी, नंदकुमार गादेवार, डॉ. नितीन जोशी या 7 जणांना जीवनगौरव पुरस्काराने तर रवी लोहाळे व निर्मलकुमार सूर्यवंशी यांना  विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष गजानन पांपटवार, सहयोगी  डी.बी. जांभरुणकर आणि डॉ. राम वाघमारे यांनी दिली आहे.

गंगाधरराव पांपटवार यांचे शैक्षणिक सामाजिक व आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान होते. सामान्य लोकांप्रती निष्ठा ठेवून त्यांनी आयुष्यभर सेवा कार्याला झोकून दिले होते. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करण्यासाठी प्रतिवर्षी गंगाधरराव पांपटवार जयंती महोत्सव व टीचर्स क्लब रुग्णालय या सेवाभावी हॉस्पिटलच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या दिग्गजांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 

पुरस्कार कार्यक्रमाचे हे पाचवे  वर्ष असून यावर्षी शिक्षण क्षेत्रासाठी माजी खासदार ज्येष्ठ लोकनेते भाई केशवराव धोंडगे, साहित्य क्षेत्रासाठी लेखक समीक्षक प्रा. भु.द.वाडीकर पत्रकारितेसाठी दैनिक देशोन्नतीचे निवासी संपादक अनिल कसबे, प्रशासकीय क्षेत्रासाठी परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, कलाक्षेत्रात नांदेड येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या कला शिक्षिका कविता जोशी, सामाजिक क्षेत्रात नंदकुमार गादेवार ,आरोग्य क्षेत्रात पोटविकार तज्ज्ञ डॉ.नितीन जोशी यांना तर विशेष पुरस्कार पोलीस नाईक रवी लोहाळे आणि  प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमत्ताने विशेष स्मरणिका प्रसिद्ध करण्यात येणार असून विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या माननीय व्यक्तींच्या लघुपटांचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर ,शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते आणि  नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन  संयोजन समिती चे अध्यक्ष गजानन पाम्पटवार यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी