लोहा| राज्यात आता आपले सरकार आले आहे गेल्या अडीच वर्षात लोहा कंधार तालुक्यातील रखडलेला विकासा आता गतीने सुरु होईल . प्रशासकीय पातळीवर जी शिथिलता आली होती त्यातही ऊर्जा येईल .ज्यांनी आपण माझ्या शब्दा खातीर निवडून दिले त्याची अवस्था आता आपणच पाहत आहात या दोन्ही तालुक्यासह जिल्ह्यातील विकासाची घोडदौड शिवसेना -भाजप युती म्हणजे शिंदे -फडणवीस सरकार मध्ये नव्या गतीने सुरू राहणार आहे.असा विश्वास जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.
राज्यात सत्तांतर झाल्या नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांचे जोरदार शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर, माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी नगराध्यक्ष भाजपा शहराध्यक्ष किरण वटटमवार, नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम , माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, माजी उपनगराध्यक्ष जफारोद्दीन शेख गटनेता करीम शेख, साहेबराव काळे गुरुजी, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, माजी उपसभापती बळीराम पाटील जाणापुरीकर नगरसेवक बालाजी खिल्लारे, भास्कर पाटील, अमोल व्यवहारे, नबी शेख, संदीप दमकोंडावार, बंडू वडजे, आपाराव पवार, रामराव सूर्यवंशी, खुशाल पाटील पागरिकर, बाबाराव पाटील गवते,माजी सभापती शंकर पाटील ढगे, लक्षणराव बोडके, लक्ष्मीकांत बिडवई , केरबा पाटील , यासह मोठ्या संख्येनी पदाधिकारी उपस्थित होते.
खा प्रतापराव पाटील यांनी या भागाचे आ श्यामसुंदर शिंदे यांचे नाव न घेता.जिकडे सत्ता तिकडे बिन बूलाये महेमान अशी काही जणांची अवस्था झाली आहे. या मतदारसंघात गेल्या अडीच वर्षात विकास थांबला. प्रशासकीय पातळीवर दप्तर दिरंगाई आली. पण हे चित्र लवकरच बदलणार आहे तेव्हा भाजपा कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा. राज्यात शिंदे -फडणवीस यांचे सरकार भाजप शिवसेनेचे सरकार आले आहे जिल्ह्याच्या नवीन विकास कामांना गती येईल तसेच लोहा कंधार या भागातील गेल्या अडीच वर्षात रखडलेला विकास पुन्हा सुरू होईल. नगर पालिकेत जे जे पूर्वी कामे मंजूर झाली त्याचा निधी आता पुन्हा प्राप्त होईल.
निधीची कमरता भासणार नाही अशी ग्वाही यावेळी खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. प्रास्ताविकात भाजपा शहराध्यक्ष माजी नगराध्यक्ष किरण सावकार यांनी अतिवृष्टी पंचनामे, शहरातील रोडचे खड्डे, बाय पास टू बाय पास सिमेंट रोड या बाबत खा. प्रतापराव पाटील यांचे लक्ष वेधून घेतले. आरंभी प्रतापराव पाटील - प्रवीण पाटील चिखलीकर यांचा खारीक खोबऱ्याचा हार घालून भव्य सत्कार करण्यात आला संचलन व आभार पत्रकार विक्रम कदम यांनी केले.
