कंधार आगाराला पंढरपूरचा विठोबा पावला...जिल्ह्यात किलोमीटर व उत्पन्नात कंधार आगाराची प्रथम कामगिरी -NNL


उस्माननगर, माणिक भिसे|
मागील दोन वर्षापासून कोरोना काळामुळे महाराष्ट्राचे गोर गरिबाचे आराध्य दैवत भाविकांना पंढरपूर दर्शनासाठी खंड पडला होता. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भाविकासाठी पंढरपूर यात्रा स्पेशल सुविधा केल्यामुळे लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूर यात्रेला गेलेत. यामध्ये कंधार आगाराने नांदेड जिल्ह्यात अव्वल कामगिरी केली असून सर्वाधिक किलोमीटर व उत्पन्नात प्रथम कामगिरी झाली आहे.

आषाढी पंढरपूर यात्रा कंधार आगारातील यात्रा कालावधीसाठी दिनांक पाच जुलै पासून ते 16 जुलै पर्यंत कंधार ते पंढरपूर यात्रा स्पेशल भाविकासाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये 284 फेऱ्या 120 चालक वाहकाने कामगिरी केली. यामध्ये मोठे प्रवासी 18442 ज्येष्ठ नागरिक 7398 तर लहान प्रवासी 619 असे 26459 भाविक भक्तांना कंधार आगारातून पंढरपूर यात्रे पंढरपूर यात्रेचे दर्शन घडून दिले. या कालावधीत 81,534 किलोमीटर तर सवलती मूल्यासह 32 लाख 94 हजार 182 रुपये चे उत्पन्न कंधार आगाराला मिळाले नगदी 27 लाख रुपयाचे उत्पन्न कंधार आगाराने घेऊन जिल्ह्यामध्ये कंधार आगार किलोमीटर व उत्पन्नात प्रथम कामगिरी केली आहे. 

या यासाठी कंधार आकाराचे चालक वाहक यांत्रिक प्रशासकीय कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यामुळे या आगाराला पूर्वीचे चांगले दिवस आले आहे. त्यामुळे कंधार आगाराला पंढरपूर पावले असे दिसून येत आहे. आगाराचे सर्वाधिक उत्पन्न व किलोमीटर केलेल्या कर्मचाऱ्यांना 15 ऑगस्ट रोजी त्यांचा योग्य ते बक्षीस देऊन त्यांना सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख अशोक चव्हाण यांनी दिली आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी