अतिवृष्टीच्या पावसाने विहीर ढासळली; वाढोण्यातील गणेश विसर्जनाचा प्रश्न आला ऐरणीवर -NNL

भाजपने केलेल्या मागणीवरून हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनर यांनी केली विसर्जन विहिरीची पाहणी 


हिमायतनगर,अनिल मादसवार| गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनाच्या कायम प्रश्न सोडविण्यासाठी नगरपंचायत अंतर्गत श्री कनकेश्वर तलावाच्या काठावर लाखो रुपयाच्या खर्चातून विहीर बांधण्यात आली होती. विहिरीचे काम थातुर माथूर झाल्याने कालच्या अतिवृष्टीमुळे विहीर पूर्णतः ढासळली आहे. त्यामुळे महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवानंतर मूर्ती विसर्जनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हि बाब भाजपने निदर्शनास आणून देत तत्काळ विहिरीचे बांधकाम करून गणेशभक्ताना न्याय द्यावा तसेच श्री मुर्त्यांची होणारी विटंबना थांबवावी अशी मागणी केली. त्यावरून आज पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनर यांनी भेट देऊन विहरीच्या परिस्थितीची पाहणी केली. तसेच तत्काळ विहिरीचे बांधकाम करून समस्या सोडवावी असे पात्र नगरपंचायतीला दिले आहे.


हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून येथे पारंपरिक पद्धतीने हिंदू-मुस्लिम बांधव एकोप्याने  गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, ईद, महापुरुषांच्या जयंत्या यासह सर्वच सण उत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरे केले जातात. मागील ५ वर्षांपूर्वी गणेशोत्सव आणि दुर्गा उत्सवाच्या काळात सर्व मुर्त्यांची श्री परमेश्वर मंदिरात विसर्जन केले जात होते. परंतु शहरात निर्माण होणारी पाणी टंचाई आणि विहिरीतील पाणी दूषित होत असल्याने शांतता कमिटीच्या बैठकीत निर्णय घेऊन यापुढे मुर्त्यांची विसर्जनासाठी इच्छापूर्ती श्री वरद विनायक मंदिरासमीप असलेल्या पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या काठावर नगरपंचायतीच्या वतीने सण २०१७ मध्ये विहीर बांधकाम करून विसर्जनाचा कायमचा प्रश्न सोडविण्यात आला. यासाठी लाखो रुपयाच्या खर्चातून विहिरीचे बांधकाम करून विहिरीच्या पुढील बाजूस लोखंडी कठडे बसविण्यात आले होते.   


मात्र त्यावेळी विहिरीचे काम थातुर माथूर पद्धतीने केवळ चौकोनी पद्धतीची विहीर बनवून तीन इंचाच्या जाडीचे काँक्रेट कमी जाडीची गजाळी टाकून कठडे बनवले गेले होते. तसेच समोरील बाजूस केवळ पाईपचे कठडे उभे करून लाखो रुपयाची हेराफेरी झाली. त्यामुळे या विहिरींची लाईफ कमी असेल हे अनेकांनी बांधकाम झालं त्याचं वेळी बोलून दाखविली होती. तर काहींनी तर कोणतेही कामे नं करता विहिरी बांधल्याची देयके काढण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली होती, याबाबतचा तश्या बातम्याही प्रकशित झाल्या होत्या. मात्र केवळ स्वार्थासाठी नगरपंचायतीच्या प्रशासनानं विहिरीचे काम करून मोकळे झाले. त्यानंतर या विहिरीकडे कोणी ढुंकूनही पहिले नाही. त्यामुळे यंदाच्या अतिवृष्टीने झालेल्या पावसामुळे विहिरीचे कठडे तुटून पडल्याने विहीर ढासळली आहे. हा प्रकार लक्षात येताच गणेश भक्तात आगामी गणेशोत्सव - दुर्गा उत्सव विसर्जनाच्या समस्येवरून नाराजी पसरली आहे.


दोन वर्षाच्या काळानंतर यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे, मात्र विसर्जन विहिरीचा प्रश्न ऐरणीवर आल्याने भाजपने यासाठी पुढाकार घेऊन हा प्रश्न तत्काळ मार्गी लागावा अशी विनंती दि.२३ जुलै रोजी केली, याची दखल घेत पोलीस निरीक्षक बि.डी. भुसनर यांनी कनकेश्वर तलावास भर पावसात भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, लवकरात लवकर विहिरीचे काम व्हावे यासाठी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देणार आहे. तत्काळ हि समस्या सुटली पाहिजे आणि गणेशोत्सव आनंदाने व शांततेत साजरा झाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहो असे नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले. व्हावा यासाठी श्रीचे विसर्ज होईल. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान, युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, वामनराव पाटील मिराशे वडगावकर, डीएसबीचे कुलकर्णी, पोलीस कर्मचारी चोले, दुर्गेश मंडोजवार, सूर्यवंशी एकंबेकर आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी