नांदेड। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यासह शिक्षणापासून वंचित असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण शिकण्यासाठी प्रोत्साहित व्हावे म्हणून दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे.
यामध्ये वह्या, पेन, बॅग अशा शिक्षणाच्या अत्यावश्यक साहित्य वाटप करून आपल्या समाजातील विद्यार्थी कशाप्रकारे गुणवंत होतील याकडे असे महत्त्व देण्याचा एक मानसिक विचार करून हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये मातोश्री महादेवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था,मायडी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, अथांग प्रतिष्ठान नांदेड, शिवराणा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था,तसेच इतर समाजातील जेष्ठ कार्यकर्ते तथा यासाठी समाजातील शासकीय अधिकारी कर्मचारी राजकीय नेते व व्यवसायिक उद्योजक नक्कीच या उपक्रमाला मोलाचे योगदान देऊन सहकार्य करतील अशी अपेक्षा होत आहे.
यासाठी जिल्हा जयंती मंडळाचे स्वागत अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, शशिकांत तादलापूरकर, नागेश तादलापूरकर सूर्यकांत तादलापूरकर, निलेश तादलापूरकर, मारोती शिकारे,माधव गोरकवाड, शिवाजी नुरूदे, शंकर सिंह ठाकुर, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक वायवळ, बालाजी गवळी, बालाजी भालेराव व रतन कांबळे हे सर्व सामाजिक कार्यकर्ते वरील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अति प्रयत्न करीत आहे.