हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव शहरातील मुख्यप्रवेशरोड हदगाव नादेड रोडवरील छञपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वराचे अर्धवट कामामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाना ञास होत आहे. यामुळे आपघात होण्याची नेहमी भिती निर्माण झालेली आहे. या मुख्यप्रवेशद्वराचे राज्याचे माजी सार्वजनिक बाधकाम मंञी तथा नादेड जिल्ह्याचे पालकमंञी आशोक चव्हाण यांच्या हस्ते गेल्या वर्षी थाटात भरपावसात उदघाटन झाले होते. कञाटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले आहे.
छञपती शिवाजी महाराज प्रवेशद्वर चे काम शहराच्या मुख्यरोडवर होत असल्याने तसेच शहराला मुख्य प्रवेश रोड एकच असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असुन, या अर्धवट कामामुळे येणाऱ्या जाणारे वाहनधारकांना प्रचंड प्रमाणात ञास सहन करावा लागत आहे. जड वाहन शहरात येवूच शकत नाही यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. छ.शिवाजी महाराज प्रवेशद्वराला नगरपरिषदेच्या वैशिष्ट्येपुर्ण योजनेअँतर्गत ७५ लाख रु निधी उपलब्ध झालेला असतांना संबंधित कञाटदाराने थातुर मातुर काम करुन या कामाची काही बील उचलून हे काम अर्धवट ठेवल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे छ.शिवाजी महाराज प्रवेशद्वराला माजी सार्वजनिक बांधकाम व नादेड जिल्ह्याचे पालकमंञी याच्या हस्ते ३० आँगष्ट २०२१ ला हदगाव तालुक्याचे आ माधवराव पाटील जवळगावकर याच्या अध्यक्षतेखाली शानदार सोहळा पार पडला होता. सदर कामाचे कञाट कोण्यातरी ठराविक कञांटदाराला हे काम मिळाल्याने तो कञाटदार बड्या राजकीय नेत्याच्या जवळचा असल्याने न.पा. प्रशासन पण हतबल झाल्याचे दिसुन येत आहे. या बाबतीत आता विद्यमान आमदारानीच या कामी पुढकार घेवून छ.शिवाजी महाराजाच्या प्रवेशद्वराचे अर्धवट कामाला गती प्राप्त करुन दयावी अशी मागणी ञस्त नागरिक वाहनधारक करित आहे ..