पहिल्या मोफत प्रशिक्षण केंद्राची ३० युवकांची बॅच संपन्न ; नवीन बॅच सिडको येथे सुरू
नवीन नांदेड। शुभंकरोती फाऊंडेशन व देसाई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवा सक्षमीकरणासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी मोफत स्किल ट्रेनिंग प्रशिक्षण शिबिरे घेतले जात आहेत.
नांदेड जिल्ह्यात युवकांना स्वयंरोजगाराचे धडे देण्यासाठी तसेच मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून सुशिक्षित तथा बेरोजगार युवकांना शुभंकरोती फाऊंडेशनच्या वतीने अनेकांना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे.
पहिली मोफत ३० विद्यार्थ्यांची बॅच बेटसांगावी येथे संपन्न झाली असून नवीन बॅच ही २७ ऑक्टोंबर रोजी सिडको येथे सुरू झाली आहे, मोफत प्रशिक्षण घेतलेले युवक हे स्वयंरोजगार झाले असून स्वतःच्या मेहनतीवर रोजगार निर्माण करण्यास सक्षम झाले आहेत.
सिडको भागात पाण्याच्या टाकी जवळील गणपती मंदिराच्या सभागृहात या मोफत प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी सुदर्शन कांचनगीरे,चेरेकर गुरुजी शुभंकरोती फाऊंडेशनचे समन्वयक अभिजीत बारडकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर गजानन चंदेल,विशाल शर्मा,शुभम गोपिनवार, सचिन वानोळे प्रशिक्षक वैभव दरबस्तवार व समन्वयक गौरव वाळिंबे आदींनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. प्रवेश प्रक्रियेसाठी संपर्क गौरव वाळिंबे :९१७२००७३०० गजानन चंदेल : ८१८०८३८१०३