नांदेड/शेगाव। राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव गृपचे संघटनमंत्री ओमकार माळगांवकर यांनी १७६१३/१७६१४ हुजुर साहेब नांदेड पनवेल हुजुर साहेब नांदेड ही रेल्वेसेवा रत्नागिरी-सावंतवाडी रोड-थिवीम-करमाळी-मडगाव पर्यंत वाढविण्याची मागणी प्रधानमंत्री मा.श्री नरेंद्र मोदी सो,केंद्रीय संचार,तंत्रज्ञान,रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबपाटील दानवे,केंद्रीय रस्ते सडक महामार्ग राजमार्ग दळणवळण परिवहनमंत्री नितीन गडकरी, मध्य रेल महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी, डी.आर.एम.दक्षिण मध्य रेल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी कुडाळ कणकवली देवगड मालवण,रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण गुहागर खेड मंडणगड दापोली,रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर गोरेगाव माणगाव श्रीवर्धन इंदापूर कोलाड नागोठणे मुरूड जं तळा-तळेगाव रोहा पेण कर्जत हे महत्वाची शहरे असुन वेगाने विकसित होणारे शहरे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असुन कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय आहे दापोली मराठवाडा विभागातील शासकीय, निमशासकीय,खाजगी कोकण कृषी विद्यापीठात अनेक नागरिक,विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक व प्राचार्य कार्यरत आहेत.
पुण्यातील दगडुशेठ हलवाई मंदिर,छत्रपती शिवाजी महाराज यांचा शनिवारवाडा ,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा केसरीवाडा,पुणे येथील अष्टविनायक दर्शन व येथील गड-किल्ले,सोलापूर येथील प्रसिद्ध अक्कलकोट महाराज मंदिर,उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्य़ातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर,बीड जिल्ह्य़ातील अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदिर,परळी वैजनाथ येथील जोतीर्लींग देवस्थान,नांदेड येथील प्रसिद्ध संचखंड गुरुद्वारा,लातूर येथील सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर,रामलिंगेश्वर मंदिर व बालाजी मंदिर येथे दर्शनास व पाहण्याकरीता जाणाऱ्या भाविकांना रेल्वेसेवा उपलब्ध नसल्याने द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. १७६१३/१७६१४ हुजुर साहेब नांदेड-पनवेल-हुजुर साहेब नांदेड चालु असणारी रेल्वेसेवा रत्नागिरी-सावंतवाडी-थिवीम-करमाळी-मडगाव पर्यंत विस्तार केल्यास कोकणातील लोकांना मराठवाडय़ात व मराठवाडय़ातील लोकांना कोकणात येण्या-जाण्यास कमी होण्यास मदत होणार आहे.तरी प्रवासी वर्गाकडून अशी मागणी केली जात आहे.
तरी प्रवाशांच्या मागणीचा विचारविनीमय करून हुजुर साहेब नांदेड पनवेल हुजुर साहेब नांदेड ही रेल्वेसेवा लवकरात लवकर वाढवुन रत्नागिरी-सावंतवाडी-थिवीम-करमाळी-मडगा पर्यंत करावी. अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनमंत्री यांनी प्रधानमंत्री मा.श्री नरेंद्र मोदी सो,केंद्रीय संचार,तंत्रज्ञान,रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबपाटील दानवे,केंद्रीय रस्ते सडक महामार्ग राजमार्ग दळणवळण परिवहनमंत्री नितीन गडकरी,मध्य रेल महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी,डी.आर.एम.दक्षिण मध्य रेल यांच्याकडे पोस्टातून निवेदन पाठवुन केली आहे.