नांदेड। संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे नांदेड व हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. रविवार दिनांक ३१ जुलै रोजी नांदेड विश्रामगृहावर सकाळी ११ वाजता आजी-माजी लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान, दुपारी १२ वाजता पदाधिकाऱ्यांची तर १ वाजता विधानसभा मतदार संघनिहाय बैठक आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजता शहरातील जेष्ठ विचारवंत व शिवसैनिकांच्या भेटी घेणार आहेत. सोमवार दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता वारंगा फाटा, १० वाजता आखाडा बाळापूर, १०.३० वाजता कळमनुरी ११.३० वाजता
हिंगोली शहराकडे प्रयाण करुन दुपारी १२ वाजता हिंगोली विश्रामगृह येथे आजी-माजी लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तर सायंकाळी ५ वाजता शहरातील जेष्ठ विचारवंत व शिवसैनिकांच्या भेटी घेऊन शिवसेना वाढीसाठी चर्चा केली जाणार आहे.
संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या समवेत माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी मंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर,श्रीमती अनुसया खेडकर,रोहिदास चव्हाण आदी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती सहसंपर्क प्रमुख -प्रकाश मारावार, भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख - दत्ता कोकाटे, आनंदराव बोढारकर, उमेश मुंडे युवासेना पदाधिकारी, महीला आघाडी यांनी दिली.