मुखेड, रणजित जामखेडकर। बँक ऑफ बडोदाच्या ११५ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मुखेड शहरातील कें.प्रा.शा.ब्रँच येथे ११५ विद्यार्थ्यांना बँक ऑफ बडोदा शाखा मुखेडच्या वत्तीने ११ हजार रुपयांच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .
यावेळी बँक ऑफ बडोदा शाखा मुखेडचे शाखा व्यवस्थापक संजय बंडीवार, सहाय्यक व्यवस्थापक बळीराम वाघमोडे, मुख्याध्यापक डी. के.किनाळकर, केंद्रप्रमुख शिवाजी कराळे ,श्री चंद्रकांत कडकंजे,शरद डावकरे,मोहमद अत्तार,बस्वलिंग काळवने,संगमनाथ पोहरेकर,वर्गशिक्षक रेखा दिनकर,उषा मेडाबलमेवार, सुनीता पाटील,सुनीता आलमले,रेखा तमशेट्टे,आश्विनी देशपांडे, संतोषी मेडेवार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.