नांदेड। खडकपुरा ते जैतापूर या रस्त्यावर रात्री आठ वाजल्यानंतर शहरात कामासाठी आलेल्या लोकांना घरी जाने म्हणजे जिवमुठीत घेऊन जावे लागत आहे.
जैतापूर, सोमेश्वर,नाळेश्वर, रहाटी, वाघी,पिंपळगाव,बोरगाव (तेलंग), सुगांव, हसापूर या प्रमुख रोडवरील गावासह अनेक छोटे गावं आहेत.नांदेड हे जिल्ह्याचे आणि मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असल्यामुळे शेतकरी,विद्यार्थी, हमाल, शेतमजूर अशा सर्वच घटकातील लोक नांदेड येथे कामासाठी येत असतात.
अनेकांना दिवसभर कामे करून रात्री उशिरा गावाकडे जावे लागते. खडकपुरा टेकड्याच्या समोरील विष्णुपुरीकडे जाणाऱ्या ठिकाणी,नाळेश्वर येथील कॅनॉल रोड येथे आणि जैतापूर जवळील विटभट्टी परिसरात वाटसंरुना अडवून बेद्दम मारहाण करून पैसे आणि इतर वस्तू बळजबरीने काढून घेतल्या जात आहेत.काही पीडित तक्रार देत आहेत तर अनेकजन पुन्हा अडवून हल्ला होईल या भीतीने तक्रार अर्ज करण्यासाठी पुढे येत नाहीत.
ही बाब अत्यंत गंभीर असून पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची व उपाययोजना करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दि.२० जुलै रोजी निवेदन देऊन करण्यात आली आहे. तसेच या मार्गावर पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी व खडकपुरा टेकडा ते जैतापूर या रस्त्यावर लूटमार करणाऱ्या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा असे निवेदनात नमूद आहे. निवेदनावर माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ. मारोती केंद्रे,कॉ.नागनाथ पवार, कॉ.श्या सरोदे,कॉ. जयराज गायकवाड, कॉ. गोपीनाथ देशमुख आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.