मुखेड, रणजित जामखेडकर। ओबीसींना मिळालेले राजकीय आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने संविधानास अभिप्रेत असलेला न्याय दिला आहे,त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी केले आहे.
आज सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा बहाल केल्याबद्दल काँग्रेस पक्षाकडून डॉ. श्रावण रॅपनवाड, विश्वनाथराव कोलमकर यांच्या नेतृत्वात आतिषबाजी करून आनंदोत्सव करण्यात आला त्याप्रसंगी रॅपनवाड बोलत होते. याप्रसंगी डॉ.रामराव श्रीरामे यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी संविधान जिंदाबाद च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करीत मिठाई वाटप करून ओबीसी काँग्रेस कार्यकर्ते आनंद व्यक्त करत होते.
आनंदोत्सवाचा समारोप करतांना डॉ.श्रावण रॅपनवाड म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचे श्रेय भाजपने घेऊ नये. महाविकास आघाडीने स्थापन केलेल्या आयोगाने दिलेल्या अहवालावर न्यायालयाने न्याय दिला आहे यात विद्यमान सरकारचे काय योगदान ? असा सवाल करीत उलट भाजपाच ओबीसी आरक्षण मिळू नये असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्नरत होता हे सर्वजण जाणतात असे रॅपनवाड यांनी म्हंटले.यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ.रामराव श्रीरामे, विश्वनाथराव कोलमकर,युवा नेते राहुलदादा लोहबंदे, नगरसेवक विजय कोतापल्ले, दिलीप कोडगिरे, हणमंत नारनाळीकर, प्रा.सूर्यकांत पांचाळ, जयप्रकाश कानगुले, शिवकांत मठपती, दिलीप गवळे, विशाल गायकवाड,रियाज शेख, इस्माईल बागवान, शिवा गायकवाड,इम्रान अत्तार,बाळू अडगुलवार, नामदेवराव कदम, इलियास कादरी, हाफिज पठाण, मंगेश शिंदे, बालाजी वाडेकर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.