अजूनही माणुसकी शिल्लक आहे..........NNL

शिर्डीत मृत्युमुखी पडलेल्या मुत्तेपवार परिवाराच्या मदतीला महासभेचे प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार आले धावून ........


शिर्डी/नांदेड।
नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील आर्य वैश्य समाजातील बांधव सतीश रामदास मुत्तेपवार यांचे शिर्डी नगरीत अकस्मात निधन झाले. तेथे कुणीच नव्हते ही बाब जेव्हा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेला कळली, तेव्हा महासभेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार हे शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. त्यांच्याशी संपर्क साधून घडलेली माहिती दिली तेव्हा नरेंद्र येरावार यांनी दर्शन सोडून कर्तव्य समजून मुत्तेपवार परिवारातील मयत सतीश यांचे बंधू बालाजी आणि कन्या कु.शिवानी यांच्याशी 

संपर्क साधून शिर्डी येथे लागणाऱ्या सर्व मदत कार्यास धावून गेले. दवाखान्यात लागणाऱ्या सर्व कागदपत्राची पूर्तता केली. राहाता येथे शवविच्छेदन करून त्यांचा पार्थिव शव वाहिनीतून नायगावला पाठवण्यापर्यंतची मदत केली. मुत्तेपवार परिवारावर आलेल्या संकट काळात धावून आलेल्या नरेंद्र येरावार यांच्या सेवा कार्याचे सर्वांनी कौतुक केले आहे.

 या घटनेची हकीगत अशी की, नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील सतीश रामदास मुत्तेपवार हे शिर्डी येथे गेले होते. परंतु त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यांचा पार्थिव शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या दवाखान्यातील शवगृहात ठेवण्यात आला होता. मृत्यू झाल्यानंतर दवाखान्यातून त्यांच्या परिवाराला कळविण्यात आले.  प्रारंभी ही बाब महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे राज्य संघटनप्रमुख प्रदीप कोकडवार यांना परिवारातील सदस्यांनी कळविले.

समाजबांधवाच्या संकट काळात धावून जाण्याचे सेवाकार्य महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा करतेच. त्याच दृष्टीने शिर्डीत दर्शनासाठी गेलेल्या राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार यांना कोकडवार यांनी घटनेची माहिती दिली. आणि येरावार हे मुतेपवार परिवाराच्या मदतीला धावून गेले. बुधवारी दिनांक 27 जुलै रोजी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळपर्यंत सर्व आवश्यक सेवाकार्य करण्यात आले. 

त्यासाठी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेशराव वाबळे, साईबाबा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीतम वडगावे, पंचनामा करण्यासाठी आलेले पोलीस अधिकारी श्री वेताळ, त्यांच्या पार्थिवावर राहता ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी तेथील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच दैनिक पुण्यनगरीचे राहता येथील प्रतिनिधी श्री खरात यांच्यासह अनेकांनी  येरावार यांना व मुत्तेपवार परिवाराला सर्वतोपरी मदत केली. 

शवविच्छेदन झाल्यानंतर सतीश मुत्तेपवार यांचा पार्थिव शववाहिनेतून नायगावकडे पाठवण्यात आला. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, बांधकाम समितीचे सभापती भानुदास वट्टमवार, राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार यांचे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार यांना या कामी मार्गदर्शन लाभले.

नायगाव पासून पाचशे किलोमीटर अंतरावर गेलेल्या सतीश मुत्तेपवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराला धीर देण्याचे कार्य महासभेच्या वतीने करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात कोठेही, केव्हाही संकट काळात सापडलेल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला सहकार्य करण्याची भूमिका महासभेने घेतली आहे. अशाही परिस्थितीत  मुत्तेपवार परिवाराच्या मदतीला धावून गेलेल्या नरेंद्र येरावार यांच्या सेवाकार्यामुळे आजही माणुसकी शिल्लक आहे असे म्हणता येईल. त्यानंतर गुरुवारी दिनांक 28 जुलै रोजी पहाटे सतीश मुत्तेपवार यांच्या पार्थिवावर नायगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी