अनुसया जेष्ठ नागरिक संघ सिडको आयोजित नेत्र व आरोग्य शिबीरास भव्य प्रतिसाद -NNL


नविन नांदेड।
नांदेड सिडको येथील अनुसया ज्येष्ठ नागरिक महिला संघाच्यावतीने आरोग्य व नेत्र शिबीर दिनांक 20 जुलै रोजी सिडको परिसरातील श्री सिध्दी गणेश मंदिरात संपन्न झाले. प्रारंभी क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन फेस्कॉमचे अध्यक्ष अशोक तेरकर यांच्या शुभहस्ते या आरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. 

याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष अशोक तेरकर यांची उपस्थिती लाभली. तर प्रमुख पाहुणे म्हणून फेस्कॉमचे सचिव जयवंतराव सोमवाड, नारायणराव वाढोणकर, डॉ. बी. जे. भांड, डॉ. सायन्ना मठमवार हे उपस्थित होते.

डॉ. रणजीत किलजे, डॉ. सुधाकर तहाडे, डॉ. तक्षशीला पवार, डॉ. साईनाथ घोडके या तज्ञ डॉक्टर मंडळींनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करुन मोफत औषधोपचार केले.अनुसया ज्येष्ठ नागरिक संघाच्या मुख्य प्रवर्तक सौ. भागिरथी बच्चेवार (सोमवाड) यांच्या सक्रीय पुढाकारातून हे आरोग्य शिबीर साकार झाले. शिबीर यशस्वी होण्यासाठी श्रीमती कमल महागावे, सौ. विजया उदावत, श्रीमती चिद्रावार, श्रीमती ताराबाई कटकमवार, सौ. सरस्वती होरे, सौ.रेशमा पारसेवार आदिंनी विशेष परिश्रम घेतले आहे. जवळपास दीडशे ज्येष्ठ महिला, पुरुषांनी या शिबीराचा लाभ घेतला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी