नांदेड| लोहा तालुक्यातील सावरगांव (न) केसू तांडा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागपंचमी सणानिमित्त नागदेव यात्रा महोत्सव आणि कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी हा महोत्सव पार पडणाऱ असून कार्यक्रमाला खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, भाजपा प्रवक्ते एकनाथ पवार, बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हंसराज बोरगावकर, विठलराव शेठकर, बालाजी पाटील कदम, पत्रकार अर्जुन राठोड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
1 ऑगस्ट रोजी बंजारा समाजाचा भजन कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर 2 ऑगस्ट रोजी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी नागपंचमी पूजा आणि कब्बड़ीचे सामने होणार आहेत. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 11 हजार 111 रुपये, द्वितीय पारितोषिक 7 हजार 777 रुपये तर तृतीय पारितोषिक 5 हजार 555 रुपये असणार आहे. मागिल 25 वर्षा पासुन केसू तांडा येथे नागपंचमी सणानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने कब्बडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. कब्बडीचे सामने पाहण्यासाठी पंचक्रोशितील नागरीक गर्दी करीत असतात..