मंगरूळच्या पुलावरून अल्पसा पाऊस होताच वाहते पाणी; पुलाची उंची वाढविण्याची मागणी -NNL

पुरात अडकलेल्या एका युवकास दोरखंडाच्या साहाय्याने सुखरूप काढले 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
गेल्या काही दिवसापासून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात पावसाचा कहर सुरूच आहे. काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मंगरूळच्या पुलावरुन पाणी वाहताना एक शेतकरी युवक पाण्यात अडकला होता. येथील गावकर्यांनी प्रसंगावधान राखून त्याला दोरखंडाच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढल्याने एका युवकाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.


हिमायतनगर तालुक्यातील किनवट- नांदेड राष्ट्रीय महामार्गापासून वारंगटाकळी पर्यंत मुख्यमंत्री सडक रस्त्याचे काम मागील ३ वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मनमानी पद्धतीने आणि निकृष्ठ दर्जाचे काम केल्याने आजघडली रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. एव्हडेच नाही तर यांच रस्त्यावर असलेल्या पुलाचे कामातही ठेकेदाराने हलगर्जीपणा करत जुन्याच पुलावर स्लॅब टाकून, जुने आणि तुटले फुटलेले पाईप वापरून काम उरकून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. त्यामुळे पुलाची उंची कमी राहिली असल्याने दररोज होणाऱ्या पावसामुळे या पुलावरून पूर वाहतो आहे.


काल दि.२८ रोजी मंगरूळसह तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे पुलावरून पाणी वाहू  लागले होते. दरम्यान हिमायतनगरला गेलेला शेतकरी युवक हनुमान जललवाड हे दुपारी २ वाजेच्या सुमारास पुरातून मार्ग काढत मंगरूळ गावाकडे जाण्याच्या प्रयत्नात होता. दरम्यान पुरातून जाताना पाण्याचा ओघ वाढल्याने तो पुराच्या पाण्यात अडकून पडला होता. यावेळी प्रसंगावधान राखून तो पुलाच्या कठडयाच्या खांबाला धरून थांबला. हा प्रकार गावातील युवकांच्या लक्षात आल्याने युवकांनी दोरखंडाच्या मदतीने पुरात अडकलेल्या त्या युवकाला एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढले. एकूणच पुलावरून नेहमी पुराचे पाणी जात असल्याने असा प्रसंग उदभवला असल्याचे नागरिकांनी सांगितले. 

याचं ठिकाणाहून गावकर्यांना शालेय विद्यार्थ्यांना, शिक्षक व इतर कर्मचारी आणि दळणवळनासाठी गावकरी नागरिकांना आणि आरोग्याच्या प्रश्नासाठी मंगरूळ, वारंगटाकळी येथील गावकर्यांना ये- जा करावी लागते. मात्र पावसाळ्यात पुलाची उंची कमी असल्याचे पुलावरून पाणी वाहत असल्याने सर्वाना तासंतास येथे ताटकळत बसावे लागते. किंवा जीव धोक्यात घालून मार्ग काढावं लागतो, अश्या घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून तात्काळ येथील पुलाची उंची वाढून देणे अवश्य असल्याचे मत ग्रामपंचायत सदस्य ताठ सोसायटीचे संचालक संतोष आंबेकर व गावकर्यांनी व्यक्त केले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी