नविन नांदेड। संततधार पावसामुळे सिडको हडको परिसरातील मुख्य रस्त्यावरील व अंतर्गत रस्त्यांवरील मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे तात्त्काळ बुजवण्यात यावेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपा नगरसेविका सौ. इंदुबाई शिवाजी पाटील घोगरे यांनी मनपा आयुक्त डॉ .सुनिल लहाने व अंभियता बांधकाम विभाग यांना निवेदनाद्वारे दिला होता, अखेर गिटी व चुरीचा साह्यानेहे खड्डे जेसीबी साह्याने बुजवण्यात आल्यामुळे वाहनधारक यांच्या सह व्यापारी व नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या सिडको हडको मधील मुख्य रस्त्यावरील व अंतर्गत रस्त्यांवरील अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे व मलनिस्सारण, पाणीपुरवठा योजना या मुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते, तात्काळ सदरील खड्डे गिटटी व मुरुम चा साह्याने बुजवण्यात यावेत अशी मागणी केली होती.
सिडको हडको परिसरात रस्ते सिमेंट काक्रेट होणार असल्याने अनेक नागरिक हे मलनिस्सारण, पाणीपुरवठा योजना बाबत पाणी लाईन घेत असल्याने रस्ता खोदल्याने व संततधार पावसामुळे नागरीकांना येजा करणा-या नागरीकासह वाहनधारकांना व शालेय विद्यार्थी व स्कुलबस यांना नाहक त्रास सोसावा लागत असुन तात्काळ गिटटी व मुरुम टाकुन खड्डे बुजवावेत , अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे
नगरसेविका सौ. इंदुबाई शिवाजी पाटील घोगरे यांनी दिला होता, सदरील रस्ता बांधकाम विभाग यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आल्यामुळे मनपाने या मागणी कडे चालढकल केली,अखेर नगरसेवक प्रतिनिधी तथा भाजयुमोचे महानगर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांनी बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याशी संपर्क साधून तात्काळ खड्डे बुजवण्यात नआल्यास आंदोलन करण्याचा इशारा देताचा बांधकाम विभागाच्या वतीने गिटटी व चुरीचा साह्याने मुख्य रस्त्यावरील खड्डे दि.२९ जुलै रोजी जेसीबी साह्याने बुजवण्यात आल्या मुळे वाहनधारक यांच्या सह व्यापारी ,नागरिक यांना दिलासा मिळाला.