दिनदुबळ्याच्या हक्कासाठी भर पावसाच्या मोसमात धर्माबाद येथे दिव्यांग, वृध्द, निराधार, गायरान पट्टेधारक यांचा मोर्चा धडकला -NNL

अनेक प्रश्नासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय, धर्माबाद येथे चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली दि २९ जुलै २०२२ मोर्चाने परिसर दणानला  


नांदेड/धर्माबाद।
दिनदुबळ्याना न्याय हक्काचा आवज शासन, प्रशासनास जाणीव व्हावी म्हणुन दिव्यांग, वृध्द, निराधार, गायरान पट्टेधारक, शेतमजुर शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नासाठी दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ व महाराष्ट्र अखिल भारतीय किसान मजदुर सभा यांच्या वतीने भव्य मोर्च्या २९ जुलै २०२२ रोजी दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, केंद्रिय सचिव अशोक घायाळे,यांच्या नेत्रत्वाखाली ऊपजिल्हाधिकारी  कार्यालय धर्माबाद येथे सतत पंचविस दिवसापासुन चालु असलेल्या पावसात शेकडो मोर्चेकर्यानी महाराष्टाचे मुख्यमंत्री महोदय,यांच्याकडे खालील मांगन्यासाठी लक्ष देऊन दिनदुबळ्याना न्याय हक्क देण्यासाठी मोर्च्यातील शिष्टमंडळानी चर्चा करून निवेदण सादर केले.

खालील मागन्या

१) या राज्यातील दिव्यांग, वृध्द निराधारांना कोणताच आधार नाही व ते कोणतेहि काम करू शकत नाहीत अशांना दरमहा एक हजार मिळनारे अनुदान चार ते पाच महिने दिले जात नाहि, व त्या अनुदानात दोन वेळेचा चहासाठी दुध ही मिळत नाहि? तेहि चालु असलेल्या लाभदारकांना दरवर्षी कुंटुबाचे एकविस हजाराचे ऊत्पन्नाचे, ह्यात प्रमाणपत्र, ईत्यादी कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दिव्यांग, वृध्द, निराधारांना एक हजार अनुदानासाठी ऊत्पन्नाची अट आहे ती रद्द करा. 

राज्यातील मंत्री, आमदारांना लाखो रू. ऊत्पन्न असताना त्यांना ऊत्पनाची कोणतिही अट का नाही ?     

दिव्यांग, वृध्द, निराधार दरमहा हजार रुपय अनुदानासाठी  तिजोरीत पैसे नसल्यामुळे चार ते पाच महिने पैसे मिळत नाहित. माजी मंत्री,माजी आमदाराना पेंशन वेतनासाठी राज्यावर हजारो कोटि रुपये कर्ज असताना साठ हजार कोटि रूपयाचे कर्ज घेऊन त्यातील तिस कोटि रूपये माजीमंत्री, आमदार यांच्या निवृतीवेतनाच्या पेशंन विधेयकाला मंजुरी दिली जाते.तसेच दिनदुबळ्यांना मानधनात वाढ का होत नाहि ? ती वाढ करावी.३) महाराष्ट्रात अतिवृष्टीने सत्तर टक्के नुकसान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहिर करून हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या.

४) तेलंगना राज्याप्रमाणे खरीप व रब्बी हंगामासाठी हेक्टरी तिस हजार रू अनुदान द्या.५) रास्त दुकानात दिव्यांग, वृध्द, निराधाराचे अंगठा येत नसल्याने राषण व अनुदान ऊचल करता येत नसल्यामुळे व्हिडीओ, तथा बायोमेट्टिक ने पुरवठा करा.६) दिव्यांग कायदा २०१६ ची कठोर अंमलबजावणी करा.७) दप्तर दिंरगाई कायद्याप्रमाणे दोषी अधिकारी यांच्यावर कठोर कार्यवाही करा. 

८) दिव्यांग बांधवाना ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरीषद यांच्या दिव्यांग पाच टक्के निधी न देणा-यावर योग्य ती कार्यवाहि करा.९) दिव्यांग कायदा २०१६ प्रमाणे  दिव्यांगास व्यंगावर अपमानित त्यांच्या संपतीबदल त्रास देणार्यास कलम ९२,९३ प्रमाणे गुन्हा नोंद करा, ईत्यादी मागण्यांसाठी धर्माबाद तालुक्यातील दिव्यांग, वृध्द, निराधार, गायरान पट्टेधारक, शेतमजुर यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालय धर्माबाद येथे दि २९ मार्च २०२२ रोजी  मोर्चात शेकडो मोर्चेकरी सहभागी झाले.

हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉ.पि.डी वासमवार, बळीराम तोटावार, चंपतराव डाकोरे पाटिल, अशोक घायाळे, कॉ.भास्कर अण्णा, मानेजी पाटिल,दिलीप पाटिल. साहेबराव बरबडेकर. लक्ष्मणराव गायकवाड,.बाबु मोतिपवळे, रामजी गायकवाड, गंगाधर पांचाळ, नागोराव भंडारे,सय्यद,गडगेकर,मोईस भाई सोनटक्के, निरंजनाबाई रापतवार, सविता बोबंले, श्री बालाजी जोंगदंड, गंगाधर जगदबे , ईत्यादी कार्यकर्ते  अशी माहिती प्रसिध्दी पत्रक दिले

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी