नविन नांदेड। श्रावणमास निमित्ताने नरोबा मंदीर कौठा येथे २९ जुलै रोजी सकाळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे नगरसेवक राजू पाटील काळे यांनी सपत्नीक विधीवत महाअभिषेक व महापुजा केल्या नंतर नगरसेवक राजू पाटील काळे यांच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा लाभ अनेक भाविक भक्तांनी घेतला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावणमास निमित्ताने जुना कौठा नांदेड येथील जागृत देवस्थान असलेल्या नरोबा मंदीर कौठा येथे २९ जुलै रोजी सकाळी महाअभिषेक व महापुजा झाल्या नंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे व नगरसेवक राजू पाटील काळे यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत महापुजा आयोजित करण्यात आली होती,महापुजा नंतर भाविक भक्तांसाठी ९ ते १ दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी आयोजित महाप्रसाद चा लाभ भाविक भक्तांनी घेतला, प्रांरभी पुजारी व्यंकटेश मुळी विधीवत पूजन केले यावेळी देवराव काकडे,व्यंकटराव काळे,छगनराव काळे,निळकंठ काळे,नंदु येरगे,केशव खिचडे, रत्नाकर कुराडे, यांच्या सह भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती , कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेद्र पाटील काळे, शंकर स्वामी व काळे परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.