नांदेड| महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस श्रेष्ठ नागरिक सेलची प्रदेशाध्यक्ष माननीय बापूसाहेब उर्फ सोनबा शिवाजी चौधरी यांनी नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक नारायण संभाजीराव शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नेमणूक केली आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा हरिहरराव भोसीकर यांनी प्रा नारायण शिंदे यांना आज नेमणुकीचे पत्र दिले. त्या समयी जिल्हा सरचिटणीस प्रा डी बी जांभरुणकर ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष श्री विश्वंभर भोसीकर प्राध्यापक अनमोल सिंग कामठेकर श्री शिवाजी देशमुख इत्यादी उपस्थित होते.