नांदेड| कोरोना संसर्गाने निधन झालेल्या कुटुंबियांना शासना कडून पन्नास हजार रुपये मदत दिली जाते पण शेख अब्दुल वहिद यांच्या भावाचे कोरोनाने निधन झाले पण पैसे मिळत नव्हते. तेव्हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुरहे यांनी सहकार्य केले आणि संबंधित वारसदार याना अनुदान मिळाले त्याबद्दल त्याचा सामाजिक कार्यकर्त्या शकीला शेख, आणि अब्दुल वहिद यांनी सत्कार केला व आभार मानले.
कोविडमुळे मृत्यू झालेल्याना शासकीय मदत मिळावी एकल महिला समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ इटनकार याना भेटून या महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. तसेच त्याच्या समस्या या बाबत एकल महिला समितीच्या ऍड दीपाताई बियाणी, अनुजा डोईफोडे अंकुश खानासोळे, प्रीती केंद्रे व सहकारी महिला यांचा जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा असतो.
कोविड मुळे मृत्यू पावलेले अब्दुल हासिफ यांचे या योजनेतील अनुदान मिळत नव्हते त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुरहे त्याचे सहकारी महसूल सहायक बालाजी चव्हाण यांनी सहकार्य केले. यासाठी एकल महिला समितीच्या सदस्या सामाजिक कार्यकर्त्या शकीला शेख,सामाजिक कार्यकर्ते शेख अब्दुल वहिद यांनी उपेक्षित महिलेस शासकीय मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुरहे यांनी सहकार्य केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या शकील शेख यांनी त्यांचा सत्कार कला आणि आभार मानले.
कोविड मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना स्वतः कुरहे हे अनुदान मंजूर झाल्याचे कळवितात तसेच त्रुटी असेल तर सांगतात .त्यामुळे या एकल महिला व व्यक्तींना मोठी शासकीय मदत होते. यासाठी जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकार, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुळकर्णी यांचे कुटुंबीयांनी आभार व्यक्ती केले.