किनवट, माधव सूर्यवंशी| राज्यात सत्तांतराच्या घडामोडी नंतर शिंदे सरकार स्थापन करण्यात आले आहे. त्या नुसार राज्यमंत्रीमंडळामध्ये समावेश व्हावा या करिता अनेक आमदार इच्छुक आहेत तर या करिता किनव चे पाटील, मानकरी मुकुंद नारायणराव नेम्मानिवार यांनी आमदार भिमराव केराम यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात यावा अशी मागणी प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
जनसंघापासुनचे भाजपाचे ज्येष्ठ सदस्य दिवंगत नारायणराव नेम्मानिवार यांचे चिरंजिव मुकुंद नेम्मानिवार यांनी निवेदनाव्दारे पक्षाकडे हि मागणी केली आहे, जनसंघ पासुन ते आज पर्यंत भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे, त्यांच्या घरी भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा नेहमी संचार असायचा व ज्यांनी भाजप किनवट तालुक्यात जिवंत ठेवली जे शेवटपर्यंत एकनिष्ठ होते अशा स्व. नारायणराव नेम्मानिवार यांचे चिरंजिव मुकुंद नेम्मानिवार यांनी पक्षाकडे विचाराचे नेतृत्व अनेक दिवसांनी प्राप्त झाले असुन त्यामुळे या भागात खुंटलेला विकास व या भागातील नागरीकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता आ. केराम यांना मंत्री पद दिले जावे अशी मागणी पक्षाकड केली आहे, या निवेदनाकडे पक्ष कसे पाहते हे आता भविष्यात पाहण्यासारखे राहिल.