जवळा दे. येथे एक मूल एक झाड आणि एक तिरंगा उपक्रमास प्रतिसाद -NNL


नांदेड|
येत्या १३ ते १७ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हा सर्वव्यापी महाउपक्रम राबविण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी झाली असून त्यासाठी त्रिसुत्री निर्माण करण्यात आली आहे. 

प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळा दे. येथे प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक ढवळे जी. एस., विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली एक मूल - एक झाड आणि एक तिरंगा असा उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत शाळेतील एका मुलाने एका झाडाचे वृक्षारोपण करावयाचे असून आपल्या घरावर तिरंगा फडकावला पाहिजे यासाठी आग्रह धरावा असे नियोजन करण्यात आले आहे. 

पर्यावरण दिन, वटपौर्णिमा, शेती शिवाराचा जागर तसेच विविध औचित्यानुसार शाळा व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आता हर घर तिरंगा ही चळवळ जोर धरत असून लोकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वव्यापी राबविण्यात येणाऱ्या महाउपक्रमाबाबत लोकचेतना निर्माण व्हावी यासाठी एक मूल - एक झाड आणि एक तिरंगा हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रत्येकजण आपापल्या घरावर येत्या १३ ते १७ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा फडकविण्याबाबत आग्रह धरणार आहेत. तसेच एक विद्यार्थी इतर दोन घरांना याबाबत विनंतीही करणार असून संपूर्ण गावात सरपंच, ग्रामसेवक, ग्राम पंचायत सदस्य, सहशिक्षक, अंगणवाडी कर्मचारी यांच्या सहकार्याने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे ढवळे जी. एस. यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी